राहुरी पोलीस तक्रार निवारण दिनी 106 तक्रारीचे निवारण
राहुरी पोलीस तक्रार निवारण दिनी 106 तक्रारीचे निवारण
वृत्तसेवा / जावेद शेख
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांच्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन राहुरी पोलीस स्टेशन स्तरावर आठवड्याचे प्रत्येक शनिवारी आयोजन करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने तक्रार निवारण दिन आज दि. 25/1/2025 रोजी 11.30. वा ते 13.00 वा दरम्यान करण्यात आलेले होते .त्यांच्या तक्रारी एकूण घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले आहे. एकूण 106 तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील कापड दुकानदार ज्वेलर्स असोशियन दुकानदार खते बी बियाणे फर्टीलायझर असोसिएशन व इ इतर नागरिक यांच्या तक्रारी जाणून घेतल्या तसेच सदर मीटिंग करता डॉ. बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर यांनी मार्गदर्शन व आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत .