Breaking
ब्रेकिंग

पोखर्डी भागात रहाणाऱ्या रवि काळेला स्थानिक समाज कंटक देत आहेत त्रास

संरक्षण मिळण्यासाठी रविने दिले पोलिस अधिक्षकांना निवेदन

0 3 9 0 2 0

पोखर्डी भागात रहाणाऱ्या रवि काळेला स्थानिक समाज कंटक देत आहेत त्रास

संरक्षण मिळण्यासाठी रविने दिले पोलिस अधिक्षकांना निवेदन

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर : दि . ५ / प्लॉट जागा स्वतःची असतानाही शेजारी पाजारी परिसरातील लोक त्रास देणे ही बाब नेहमीच घडताना दिसते .
अशीच एक घटना अहिल्या नगर तालुक्यातील छत्रपती संभाजी नगर रोडच्या पोखर्डी भागातील आहे . येथील स्थानिक रहिवाशी असलेले
रवी गणेश काळे यांचे पोखर्डी येथील काळा माथा
भागात घर असुन घरा शेजारीच त्यांचा स्वतःच्या मालकीचा प्लॉट आहे . परंतु या परिसरातील काही समाज कंटक जागेच्या हव्यासापोटी
त्यांना त्रास देत आहेत . या त्रासाला कंटाळून रवि काळे यांनी नगरचे मा .पोलिस अधिक्षक राकेश ओला साहेबांना निवेदन दिले आहे .

सदर निवेदनात म्हटले आहे की, माझी जागा काही समाज कंटक ताब्यात घेण्याच्या दृष्टीने मला त्रास देत आहेत. पोखर्डी ता. जि. अहिल्यानगर येथे काळा माथा येथे शेतीजमीन असुन सदर शेत जमीन (दस्तावेज क्र. 7798/10 आणि 2806/17 आहे गट नं. 171/1) एकूण साडेतीन गुंठे जागा नगर-संभाजीनगर रोड, काळामाथा, पोखर्डी ता. जि. अहिल्यानगर या ठिकाणी असुन सदर जागा माझे नावे असुनही माझ्या परीसरातील काही समाजकंटक लोक माझ्या मोकळ्या जागेवर ताबा मारण्याच्या दृष्टीने मला त्रास देत आहेत.

मला माझे जागेवर तारकंपाउड करताना समाजकंटक लोक माझे तार कंपाउडचे खड्डे तेथे आम्ही कोणीही नसल्यावर वारंवार बुजवत आहेत. त्यामुळे मला विना कारण खर्च येत आहे. तरी माझे संरक्षणार्थ मी आपणास विनंती अर्ज देत आहे या समाज कंटक लोकांपासून संरक्षण मिळावे असे निवेदन देण्यात आले आहे . यावर पोलिस प्रशासनाने कार्यवाही करून न्याय द्यावा अशी माफक अपेक्षा रवि काळे  यांची आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे