जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आयोजित लोकन्यायालयात ७२ प्रकरणे निकाली

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आयोजित लोकन्यायालयात ७२ प्रकरणे निकाली
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आयोजित लोकन्यायालयात ७२ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून २ कोटी ७ लाख ५६ हजार ६१४ रुपयांची वसुली करण्यात आली. विशेष म्हणजे दोन कौटुंबिक तडजोडी होऊन महिला नांदण्यासाठी गेल्या तर एका प्रकरणात व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन वाटणी चा निकाल देण्यात आला.
या लोकअदालतीत १४७९ प्रलंबित व ११०७ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यात ४६ प्रलंबित व २६ वादपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. न्यायालयाच्या आवारात मी समाधानी आहे असे शीर्षक लिहिलेला सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता. ज्यांच्या प्रकरणात तडजोडी झाल्या त्यांनी स्वतःहून आनंदाने सेल्फी काढले. पॅनल प्रमुख म्हणून वरिष्टस्तर दिवाणी न्यायाधीश प्रवीण देशपांडे , न्या. निलेश यलमाने , न्या स्वाती जोंधळे यांनी तर पॅनल सदस्य म्हणून ऍड प्रशांत संदानशिव , ऍड शेखर खैरनार , ऍड शुभांगी निकम यांनी काम पाहिले. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष ऍड किरण पाटील , ऍड के व्ही कुलकर्णी ,ऍड ए पी भट , ऍड जी वाय विंचूरकर , ऍड एम जे बागुल ,ऍड किशोर बागुल सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड विवेकानंद चौधरी , ऍड प्रणिता गांधलीकर ,ऍड एम एच बडगुजर ,ऍड संदीप बोरसे यांचे सहकार्य लाभले.