Breaking
ब्रेकिंग

मतीमंद मुलीचा बलात्कार प्रकरणी आरोपीस सश्रम कारावासाची शिक्षा

0 3 9 0 8 1

 

प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

आरोपी रमेश रघुनाथ मोकल यास २२ वर्षाच्या मतीमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश, श्री. ए.एस. राजंदेकर साो., यांनी दिनांक १२/११/२०२४ रोजी महत्वपुर्ण निकाल दिला. सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता श्रीमती स्मिता राजाराम धुमाळ पाटील यांनी सरकारपक्षातर्फे मा. कोर्टासमोर केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला. सदर खटल्यात आरोपी रमेश रघुनाथ मोकल यांच्यावर भा. द. वि. सं. ३७६ (२) एल ३७७, ४५२, ५०४ व अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९७९ चे कलम ३ (१) (w) (i), ३(२) (v) प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्यातील आरोपी रमेश रघुनाथ मोकल यास भा. द. वि. सं. ३७६ (२) एल करीता १० वर्षे शिक्षा व रु. १,०००/- दंड तसेच भा. द. वि. सं. ३७७ करीता ५ वर्षे व रु. १०००/- दंड, व भा. द. वि. सं. ५०६ करीता १ वर्षे शिक्षा व रु. ५००/- दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

थोडक्यात हकिकत अशी की, सदरचा गुन्हा हा दि. २३/०६/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते ६.०० या दरम्यान सदरचा गुन्हा फिर्यादी यांच्या राहत्या घरी, मौजे मळेघर, अॅरोसिटी रोड, ता. पेण जि. रायगड येथे घडला होता. फिर्यादी हीची बहीण पिडीता हि मतीमंद आहे  हे माहित असताना देखील फिर्यादीच्या घराशेजारी राहणारा तिचा सख्खा दिर असलेला आरोपी याने फिर्यादी व तिचा पती हे घराबाहेर कामावर केले असता पिडीता ही घरात एकटीच आहे हे पाहुन तिच्या मतीमंदपणाचा फायदा घेवून आरोपी याने फिर्यादीच्या राहत्या घराच्या खिडकीतुन घरात प्रवेश करुन पिडीता हिच्यावर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केले व अनैसर्गिक संभोग केला. यावर पिडीतेची बहीण साक्षी राकेश मोकल हिने  पेण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी याच्याविरुध्द तक्रार नोंदविली असता, हया प्रकरणी सदर केसचा तपास श्री. संजय शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापुर विभाग, अति. कार्यभार पेण विभाग व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलदगतीने तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता श्रीमती स्मिता राजाराम धुमाळ पाटील, यांनी एकूण १६ महत्वाचे साक्षीदार तपासले व मे. कोर्टासमोर श्रीमती स्मिता धुमाळ विशेष सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला. यातील फिर्यादी साक्षीदार साक्षी राकेश मोकल, पिडीता मुलगी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सिंग, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल शर्मा तसेच विशेष शिक्षिका नैनिता लक्ष्मण पाटील व तपासिक अंमलदार श्री. संजय शुक्ला यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच पो. ह. श्री. सचिन खैरनार, पैरवी कर्मचारी म.पो.शि. सौ. प्रियंका नागावकर, यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे