Breaking
ब्रेकिंग

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा

0 7 6 9 4 4

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

कुर्डूवाडी: दि. २०/ कुर्डूवाडी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय मध्ये मकर संक्राती निमित्त पालक माता भगिनी यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या माता पालक महिला शिक्षक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रशाले तर्फे सर्व माता-पालक यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी महिला पालकांनी प्रशालेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये संगीत खुर्ची हा मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आला. यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकास प्रशालेतर्फे आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार टोणपे, संस्थेचे सचिव रोहन टोणपे, कोषाध्यक्ष डॉ. रोहित टोणपे यांनी कौतुक व अभिनंदन केले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे