अमळनेर शहरात वीजेचे लपंडाव सत्र चालूच ; प्रचंड त्रास सहन करत आहेत नागरिक

अमळनेर शहरात वीजेचे लपंडाव सत्र चालूच ; प्रचंड त्रास सहन करत आहेत नागरिक
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर शहरात मागील काही दिवसापासुन वीजेचे लपंडाव सत्र चालू आहे व यामुळे नागरिक त्रास सहन करावा लागत आहे यातच उन्हाळा सुरु असल्याने
भर दुपारी नागिरक कुलर, फॅन, ए.सी यांचा मोठ्या वापर
करत असतात.२४ एप्रिल २५ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांनी मान.अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री नेमाडे साहेब महावितरण कंपनी उपविभाग -१ यांना निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की अमळनेर शहरातील कोणतेही भागातील उच्च दाब व लघु दाब वाहिनीवरील वीज दुरुस्ती करण्यासाठी कुठलेही पूर्व सूचना न देता विद्युत पुरवठा वारंवार खंडित केला जात आहे त्यामुळे वीज ग्राहकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे.दुपारी व संध्याकाळी उन्हाचे दिवस असल्याने घरात पंखे कुलर अचानक बंद होतात त्यामुळे वीज ग्राहकांना तसेच वयोवृद्ध, गृहिणी आणि बालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.चौकशी करता आपल्या कक्ष कार्यालयात फोन केल्यास ते कोणते प्रकारचे प्रतिसाद देत नाही किंवा फोन बंद असल्याचे समजते . तरी आपण जातीने लक्ष घालून वीज पुरवठा विना सूचना न देता खंडित करू नये अशी सूचना वजा तक्रार करण्यात आली आहे.