Breaking
ब्रेकिंग

ढेकुरोड परिसरात घरफोडीची घटना ; एकूण सुमारे 64 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास*

0 8 6 6 5 9

*ढेकुरोड परिसरात घरफोडीची घटना ; एकूण सुमारे 64 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास*

जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव – अमळनेर शहरातील जय योगेश्वर कॉलनी, ढेकुरोड परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे 64 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वैषाली चंद्रकांत वाघ (वय 48) या आपल्या कुटुंबासह काही दिवसांपासून पुणे येथे वास्तव्यास गेल्या होत्या. दि. 14 मार्च रोजी त्यांनी अमळनेर येथील राहत्या घराला कुलूप लावून पुण्याला प्रस्थान केले होते.
दि. 4 एप्रिल रोजी त्यांच्या मुलगा दर्पण वाघ यास मित्रामार्फत घराचे कुलूप तुटले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ओळखीच्या व्यक्तीकडून घराची पाहणी करण्यात आली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले व कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले.
दि. 5 एप्रिल रोजी कुटुंब अमळनेर येथे परतल्यानंतर चोरी झाल्याची खात्री झाली. घरातील लोखंडी कपाटातील तिजोरी उघडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने व सुमारे 12 हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे आढळून आले. दरम्यान, घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दि. 3 एप्रिल रोजी पहाटे 2.36 ते 2.52 वाजेच्या दरम्यान चार अज्ञात इसम घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून आत प्रवेश करून चोरी करताना दिसत आहेत.
या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे