Breaking
ब्रेकिंग

जीवन यशस्वी करण्यासाठी साधना, योग्यता,कृपा असणे आवश्यक असते – ह.भ.प.योगेश महाराज खेंडके

0 7 6 9 4 3

जीवन यशस्वी करण्यासाठी साधना, योग्यता,कृपा असणे आवश्यक असते – ह.भ.प.योगेश महाराज खेंडके

वाळकी प्रतिनिधी /  (दादासाहेब आगळे)

अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे श्री तुकाई माता मंदिर जिर्णोद्धार समिती व गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून उभारलेल्या तुकाई मंदिर कलशारोहन सोहळ्यानिमित्त पंचदिनी किर्तन सेवा संपन्न होत आहे यावेळी गुरुवारी (दिं.१९) रोजी ह.भ.प.योगेश महाराज खेंडके (भागवताचार्य) यांचे किर्तन सेवा झाली यावेळी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर साधना,योग्यता आणि कृपा असावी लागते.
तसेच परमार्थ सोपा नाही माणसं फक्त म्हणतात काही नाही परमार्थ करायचं म्हणजे काय कामांमध्ये काम आणि म्हणा राम राम उठलं की खिचडी खायची आणि झेंडा घेऊन निघायचं झाला परमार्थ इतका सोपा नाही.परमार्थ करण्यासाठी साधना करावी लागते आणि ही साधना करत असताना संसार सोडून देण्याची गरज नाही, तर संसारात राहूनच नामस्मरण, गुरुआज्ञा पालन आणि निस्वार्थ बुद्धीने कर्म करणे हा खरा परमार्थ आहे दररोज नित्यनियमाने देवाचे नामस्मरण, सत्संग आणि संतांचे विचार आचरणात आणणे ही परमार्थात मुख्य आहे.परमार्थामध्ये इतर साधना करून मिळणारा जो मोक्ष आहे तो मोक्ष मिळेल का? संतांच्या पायाच्या मातीमध्ये ही ताकद आहे की मोक्षाला प्राप्त करून आनंद मिळेल परंतु एखाद्याच्या पायाला स्पर्शित झालेली माती आणि जो असणारा मोक्ष आहे हे मिळणं हे सरासरी कुठे संबंध जमतो का? जुळतो का?पायाखालची माती घ्यायची आणि मोक्ष मिळवायचे जसं स्वयंपाक बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अग्नी महत्त्वाची असते कोणतीही वस्तू नसू द्या तर स्वयंपाक बनवता येतो तथा त्याप्रमाणे ज्ञानाविना मोक्ष नाही ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त करता येत नाही.असे ह.भ.प.योगेश महाराज खेंडके यांनी आपल्या किर्तन सेवेतून सांगितले.
यावेळी या पंचदिनी किर्तन सेवेसाठी साथ संगत म्हणून मृदुंगमहामेरू अवधेश महाराज राऊत, संगीतअलंकार नागेश महाराज नानकिल्ले,संगीत विशारद गणेश महाराज गायकवाड, मृदंगमहामेरू अनिकेत महाराज लांडे,ह.भ.प.अशोक महाराज पिंपरकर,ह.भ.प.भिवसेन महाराज हराळ,जय मल्हार भजनी मंडळ, राधाकृष्ण भजनी मंडळ,प.पु.आनदाश्रम स्वामी भजनी मंडळ,मानेमळा,जाधव वस्ती,कुताळमळा,हराळ मळा,चौधरवाडी,धावडेवाडी, कासार मळा रामवाडी, तुकाई मळा आदींची साथ लाभत असून दररोज होत असलेल्या अन्नदान महाप्रसादाचा भाविक भक्त लाभ घेत आहेत.या कार्यक्रमासाठी गुंडेगाव वाडी वस्तीसह पंचक्रोशीतील,माडंवगण,राळेगण,कामठी,वडघुल येथील ग्रामस्थ भाविक भक्त,महिला मोठ्या संख्येने उपस्थित रहात आहेत.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे