स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचा वसा पुढे नेणार , मला पुन्हा आमदारकी लढायची नाही – अनुराधा नागवडे यांचे भावनिक आवाहन…
स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचा वसा पुढे नेणार , मला पुन्हा आमदारकी लढायची नाही – अनुराधा नागवडे यांचे भावनिक आवाहन…
प्रतिनिधी : जयसिंग पवार
“मला पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवायची नाही फक्त एकदा आमदारकी म्हणून संधी द्या असे भावनिक आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी केले. स्व. माजी आमदार शिवाजीराव बापू नागवडे यांचा वसा पुढे घेऊन जाणार आहे. बापूंनी उभा केलेला कारखाना शेतकऱ्यांची कामधेनू आहे त्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही असे देखील अनुराधा ताई यांनी सांगितले.शिवाजी बापू नागवडे यांचे श्रीगोंदा तालुक्यात मोठे वलय आहे त्यांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे.काँग्रेसच्या गोटातील जेष्ठ नेते म्हणून बापू यांच्याकडे पाहिले जात होते त्यांचाच विचार पुढे नेण्यासाठी मला एकदा जनतेची सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन अनुराधा ताई यांनी केले.कोणत्याही कामात कमी पडणार नाही. मतदारसंघाचा कायापालट करण्याची ग्वाही देखील नागवडे यांनी दिली..