Breaking
ब्रेकिंग

सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन

0 8 9 8 5 2

सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन

राहुरी तालुका /  जावेद शेख

नुकतेच करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव मा.डॉ महानंद माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी संस्थेचे संचालक डॉ क्षीरसागर साहेब ,श्री राजू राठोड साहेब तसेच म फु कृ वि चे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.विलास आवारी सर व तसेच सा फु मा वि चे प्राचार्य श्री तुपविहिरे सर ,उपप्राचार्य श्री डोंगरे सर पत्रकार श्री जावेद शेख , राजेंद्र पवार,श्री जालिंदर बेल्हेकर विद्यार्थी व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाच्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट परेड सादर करून पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या लेझीम पथक, झांज पथकाने उत्कृष्ट प्रदर्शन केले. लेझीम पथकास विद्यालयाचे शिक्षक श्री नवनाथ निकाळजे व झांज पथकास श्रीमती वृषाली बाबर व श्रीमती शलाका वाबळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्यांनी चित्तथरारक मानवी मनोरे प्रदर्शनाने उपस्थितांची वाहवा मिळवली .त्यांना क्रीडाशिक्षक श्री दादासाहेब वाघ यांनी मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी क्रीडाज्योत संचलन केले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिरंगी ध्वजाच्या रंगाचे फुगे आकाशात सोडले त्यामुळे कार्यक्रमास अजून बहार आली. उपस्थित विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव डॉ महानंद माने यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक गुणवत्तेसोबत कला व क्रीडा स्पर्धाही महत्वपूर्ण आहेत.
या क्रीडामहोत्सवाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या सौ योगिता आठरे मॅडम होत्या. यानंतर विविध मैदानी खेळाच्या स्पर्धा पार पडल्या .विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली .या स्पर्धेतील मुलांचे नैपुण्य पाहून संस्थेचे सचिव मा.डॉ माने साहेब , उपस्थित मान्यवर व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक श्री रविंद्र हिवाळे, श्री पानसंबळ श्री अविनाश पंधरे, श्री हरेश्वर साळवे , श्री विशाल नांगरे ,श्री हिरामण साळवे,श्री अजिंक्य भिंगारदे , सौ अश्विनी जोशी ,श्रीमती अनिता वाघमारे, श्रीमती मंजुषा डागवले ,श्रीमती अंजुम शेख , श्रीमती आशा उंडे , कु मोनिका शिंदे, सौ कल्पना तोडमल ,श्रीमती नाजनीन शेख कु सुनयना खंडागळे ,कु संजना खंडागळे श्रीमती खंडागळे श्रीमती पवार तसेच सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 8 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे