Breaking
ब्रेकिंग

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी यांची ग्रामीण रुग्णालय रुई व विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाला येथे सदिच्छ भेट

0 3 9 0 2 6

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी यांची ग्रामीण रुग्णालय रुई व विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाला येथे सदिच्छ भेट

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

भिगवण: दि. २५/ दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय रुई व विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाला येथे सदिच्छ भेट दिली.

दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. रामदास झोळ सर, उपाध्यक्ष श्री राणा दादा सूर्यवंशी, सचिवा सौ. माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जेडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय रुई येथील रुग्णालयास भेट देऊन तेथील क्ष- किरण विभाग, औषध विभाग, रोग निदान विभाग व अतिदक्षता विभाग इ. विभागास भेट देऊन, रुग्णालयाचे कामकाज कशा प्रकारे चालते? तेथील डॉक्टर कर्मचारी व पेशंट यांची भेट घेऊन रुग्णालया विषयीची माहिती जाणून घेतली. तसेच विश्व चैतन्य आयुर्वेदिक रस शाळा या ठिकाणी जाऊन कच्च्या मालाचा विभाग, पक्क्या मालाचा विभाग, विश्लेषणात्मक विभागात क्यू ए क्यू सी, तयार औषधे व औषध वनस्पती उद्यान या विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच वॉटर पुरिफिकेशन, प्लांट गार्बेज ट्रीटमेंट प्लांट या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी तेथील विविध प्रकारच्या विभागांना भेटी देऊन तेथील कामकाजाची संपूर्ण माहिती आत्मसात केली. तसेच महाविद्यालयांमधील प्रा. श्री श्रेयस बंडगर सर, प्रा. रणजीत साखरे सर, आणि प्रा. रक्षा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांसोबत वरील सर्व ठिकाणची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना पुढील भविष्यात संधी बाबत मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे