संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा
संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. २९/ जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री रोहन टोणपे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये असलेले खेळाचे महत्व महत्त्व पटवून सांगितले.
क्रीडाशिक्षक श्रीकांत सावंत सर यांनी मेजर ध्यानचंद यांचे हॉकी क्षेत्रातील योगदान विद्यार्थ्यांना सांगितले तसेच फिट इंडिया ची शपथ विद्यार्थ्याकडून घेण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुकमोन वाघमोडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल गोरे, पंडित आतकर, ज्योती खरात, वैशाली वाडेकर, रुक्मीन गायकवाड, साधना माळी, धोंडीराम लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे सर यांनी कौतुक व अभिनंदन केले.



