एरंडोल येथे ओमनगरात मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी….!
एरंडोल – येथे ओमनगरात राजमाता जिजाऊ जयंती १२ जानेवारी २०२५ रोजी रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली.आमदार अमोल चिमणराव पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी अमित पाटील,प्रा.मनोज पाटील, माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, गजानन पाटील, डॉ.सुरेश पाटील, अभिजित पाटील, संभाजी पाटील, शालिग्राम गायकवाड, विजय महाजन,अतुल पाटील, किशोर सोनार, राजेंद्र शिंदे,भाईदास पाटील, देविदास महाजन, प्रसाद दंडवते,आर.एस.पाटील, हिंमत पाटील,प्रा.आर.ए.पाटील, सुधाकर पारधी, आर.टी.पाटील,रवि जाधव, जगदीश पाटील, एस.आर.पाटील,डि.एस.पाटील,एस.ए.इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष हे की यावेळी महिला सामाजिक कार्यकर्त्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.शोभा साळी,वर्षाताई शिंदे, शालीनी कोठावदे, रश्मी दंडवते, प्रा.डाॅ.मिना काळे, प्रमिला पाटील,प्रतिभा पाटील, वैशाली पाटील आदी महिलांचा समावेश होता.
अभिलाषा समाधान पाटील या मुलीने राजमाता जिजाऊ यांच्या चरित्राबद्दल माहिती दिली.रविंद्र लाळगे यांनी जिजाऊ व शिवरायांचे तसेच इतर सर्व महापुरुषांचे चरित्र हे घरा घरात अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पोहोचले पाहिजे.जेणेकरून जिजाऊ तयार होतील.असे प्रतिपादन केले.
आमदार अमोल पाटील यांनी जिजाऊ व शिवरायांचे चरित्र हे घरा घरात पोहोचले तर एक आदर्श असा नवा महाराष्ट्र घडेल.असा विश्वास व्यक्त केला.
प्रास्ताविक शोभा साळी यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय पाटील, समाधान पाटील, पंकज पाटील, स्वप्निल बोरसे,गोटू पाटील, हेमंत पाटील, कविराज पाटील,टिनू ठाकूर,करण वाघ,विवेक पाटील, स्वप्निल सावंत यांनी परिश्रम घेतले.