Breaking
ब्रेकिंग

आप तर्फे खोपोली शहरात अनोखे आंदोलन नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे भरवणार प्रदर्शन

0 3 9 0 8 3

आप तर्फे खोपोली शहरात अनोखे आंदोलन नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे भरवणार प्रदर्शन

अलिबाग / प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

आम आदमी पार्टी खोपोली शहरात नेहमीच नागरिकांच्या तक्रारी व समस्यांवर आवाज उठवत असते व त्याबाबत पाठपुरावा करत असते. पक्ष नागरिकांच्या समस्या व तक्रारी निवेदनाच्या मार्फत प्रशासना कडे मांडत असते परंतु नगरपरिषद प्रशासन, महावितरण, तहसीलदार कार्यालय यांच्याकडून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही व उत्तरे मिळत नसल्याकारणाने आम आदमी पार्टी तर्फे सदर समस्या व तक्रारींचे प्रदर्शन गुरुवार दिनांक 05 जून 2025 रोजी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत खोपोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर ठेवण्यात येणार आहे.

सदर प्रदर्शनामध्ये नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी व आम आदमी पार्टी तर्फे प्रशासनाकडे करण्यात आलेले पत्र व्यवहार अथवा निवेदने यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे असे खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले.

नागरिकांनी सार्वजनिक समस्यांबाबत बोलणे आवश्यक आहे व त्याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे. शहरामध्ये कुठेही काहीहीवनागरिकांनी न घाबरता प्रशासकीय समस्या आमच्यापर्यंत पोहोचवावे असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे