
बस चालक व वाहक यांनी केली जखमी महिलेला मदत
चालक वाहकाने माणुसकीचे घडविले दर्शन
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अवकाळी पावासाने सर्वीकडे रस्ते खराब
झाले असल्यामूळे खड्ड्यात पाणी साचल्याने अंदाज
न आल्याने मोटरसायकल वरुन वृद्ध महिला खाली
पडल्याने गंभीर जखमी झाली .
त्यावेळी वृद्ध महिलेला दवाखान्यात नेणे गरजेचे असताना ज्ञानेश्वर हिलाल बेहरे एकलहरेकर यांच्या सांगण्यावरुन ते स्व:ता तिकडून शिंदखेडा अमळनेर बस क्रमांक एम एच १४ बी टी १३५२ मध्ये होते व त्यांनी लगेच क्षणांचा विलंब न करता. बस थांबवली आणि चालक अधिकरव जयराम पाटील व वाहक वैशाली अर्जुन बोरसे यांना विनवणी करत जखमी वृद्धेला रुग्णालयात नेण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न करता चालकाने एस टी सरळ डॉ निखिल बहुगुणे यांच्या दवाखाण्यात आणली. दुर्दैवाने वृद्धेचा मृत्यू झाला असला तरी बस चालक आणि वाहकाच्या माणुसकीचे कौतुक होत आहे.