महाराष्ट्राच्या चिमुकली हिरकणी कुमारी शर्विका म्हात्रे हिची जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली स्नेहभेट
महाराष्ट्राच्या चिमुकली हिरकणी कुमारी शर्विका म्हात्रे हिची जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली स्नेहभेट
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
महाराष्ट्राची हिरकणी कुमारी शर्विका म्हात्रे हिला माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार त्यांच्या शिष्टमंडळातील काही अधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर तसेच भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे अधिकारी आज भेटण्यासाठी आले होते….
सुमारे अर्धा तास त्यांनी शर्विकाशी गप्पा मारून पुढील भवितव्याबाबत अनेक निर्णय घेतले…..
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. याच म्हणीला साजेशी चिमुकली म्हणजे शर्विका म्हात्रे !अवघ्या सात वर्षांच्या या चिमुकलीने आजवर १२१ हून अधिक किल्ले सर केले आहेत. छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास जाणून घेण्याची तिची ही तळमळ खरंच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शर्विकाने सर्वात कठीण असा लिंगाणा हा किल्ला सर करत आणखी एक विक्रम रचला. या अशाच दैदिप्यमान कामगिरीमुळे शर्विकाला जागतिक विक्रमवीर आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळखले जाते.तिला लाभलेले लाखमोलाचे संस्कार इतक्या कमी वयातच गडकिल्ले सर करण्याचं आणि आपला पराक्रमी इतिहास जपण्याचं बळ देत आहेत.
आज शर्विकाची कौतुकपर भेट आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी घेतली. यावेळी तिच्याशी मनमोकळ्या गप्पा रंगल्या आणि तिचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, समस्त म्हात्रे कुटुंबीयसह आणि ऍड. महेश मोहिते भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.