Breaking
ब्रेकिंग

देवा भाऊच्या शपथविधी प्रसंगी भिंगारला मुख्यमंत्री आपला दवाखाना चा शुभारंभ

0 3 9 0 7 9

देवा भाऊच्या शपथविधी प्रसंगी भिंगारला मुख्यमंत्री आपला दवाखाना चा शुभारंभ

प्रतिनिधी : महेश कांबळे

नगर– राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत अहमदनगर छावणी परिषद क्षेत्रात दोन शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर झाले असून भिंगार मधील जुनी सरदार वल्लभभाई पटेल शाळा (वाड्याची शाळा) येथे नव्याने तयार केलेल्या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे (UHWC) मुख्यमंत्री आपला दवाखाना उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार या महायुतीच्या शपथ ग्रहण प्रसंगी करण्यात आले अशी माहिती छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी दिली .

5 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजता छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिग. रसेल डिसोझा यांच्या हस्ते मुख्यमंत्री आपला दवाखाना चा शुभारंभ करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विक्रांत मोरे ,उपाध्यक्ष वसंत राठोड ,मॉर्निंग ग्रुपचे संजय सपकाळ,किशोर कटोरे,विशाल अण्णा बेलपवार, डॉक्टर धनंजय कर्डिले, डॉक्टर अभिजीत आल्हाट, जेष्ठ नागरिक विठ्ठलराव लोखंडे,मिराबाई आल्हाट,आर एम ओ डॉ गीतांजली पवार, अधीक्षक नेहा पारनाईक,राजेश काळे आदींसह भिंगार वासीय उपस्थित होते .

या शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मोफत उपचार मिळणार असून त्यांना राहत्या घरापासून जवळ आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे