मंदिराची दानपेटी फोडली ?
चोरट्यांनी श्री चांगदेव मंदिराची दान पेटी फोडली. .
विशेष प्रतिनिधी : रफिक शेख
नगर : नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे लहान मोठ्या चोऱ्याचे प्रमाण अधिकच वाढतच चालले आहे अशा या प्रकरणामुळे ४ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यानी मंदिरातील दान पेट्या फोडून रुपये चोरून नेले अशी मा. सरपंच शंकरराव साठे यांना माहिती समजली असता नगर तालुका पोलीस यांना संपर्क करण्यात आला पोलिसांनी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला एक पेटी मध्ये नोटा नसून चिल्हर मिळून आली. त्यामुळे पोलिसांनी खोदा पहाड निकला चुवा असा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यानी एकाच दिवशी मंदिरातील दान पेटी फोड्ल्या…
नगर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नारायणडोहो येथे भव्यदिव्य असलेले श्री चांगदेव मंदिर, महादेव मंदिर,दर्गा,भैरवनाथ मंदिर, राम मंदिर, मज्जीद,मारुती मंदिरे गावठाण हद्दीत आहे. या मंदिरापैकी जल्मभूमी श्री चांगदेव मंदिर ऐतिहासिक म्हणून आहे .मंदिरा मध्ये एक दान पेेटी ठेवलेली होती. दरवर्षी या दान पेटीत 20 ते 30 हजार रुपये भाविक भक्त दान करतात. मात्र ४ डिसेम्बर रोजी अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील दान पेटी फोडून त्यातील हजारो रुपये लंपास केले. हा प्रकार ४ डिसेम्बर रोजी संद्याकाळी हे करण्यासाठी मंदिराजवळ गेले असता दान पेटीचे कुलूप तुटलेले दिसून आले.महिला हरिपाठ साठी ७:०० वाजता गेल्या ग्रा.प. सदस्या विठाबाई साठे त्यानी कुलूप तुटलेल्या अवस्थेत पहिले व त्यांनी लगेच या घटनेची माहिती माजी सरपंच शंकरराव साठे,ग्रा. प. सदस्य संतोष साठे व दत्तात्रय साठे, मोहन साठे, कैलास साठे यांना दिली असता नगर तालुका पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचासमक्ष पंचनामा केला असता मंदिराच्या दान पेटीत नोटा नसून फक्त चिल्लर आढळून आली त्यामुळे पोलिसांना खोदा पहाड निकला चुहा असा प्रकार पाहायला मिळाला.