Breaking
ब्रेकिंग

धनगराचा मुलगा ” बिरदेव ढोणे ” झाला कलेक्टर

0 3 9 1 0 5

धनगराचा मुलगा ” बिरदेव ढोणे ” झाला कलेक्टर

कळत नकळत “अरविंद केजरीवाल” यांची झाली मदत

अलिबाग प्रतिनिधी राजेश बाष्टे

महाराष्ट्र राज्यातील कागल तालुक्यातील एका छोट्याशा गावातील धनगर समाजाचा एक मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा बिरदेव ढोणे यांनी या देशातील सर्वात अवघड समजली जाणारी यूपीएससीची परीक्षा पास केली असून तो आयएएस झालेला आहे व लवकरच त्याची कलेक्टर म्हणून नियुक्ती होणार आहे.

आपले मनोगत व्यक्त करताना बिरदेव ढोणे यांनी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकारमुळे मिळालेल्या 200 युनिट वीज बिलच्या सवलतीमुळे हलाखीच्या दिवसात आपल्याला कळत नकळत मदत झालेली आहे व त्यामुळे शिक्षण घेण्यास सुलभ झालेले आहे असे सांगितले आहे.

दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांची सरकार असताना दिल्लीमध्ये 200 युनिट वीज बिल, महिलांना मोफत बस प्रवास, मुलांना उत्कृष्ट अशा सरकारी शाळा, उत्कृष्ट असे मोफत मोहल्ला क्लिनिक अशा एक ना अनेक सुविधा उपलब्ध होत्या त्यामुळे कळत नकळत कित्येक विद्यार्थी जे दिल्लीमध्ये यूपीएससीची परीक्षा पास करून आयएएस आयपीएस बनण्यासाठी जातात त्यांना मदत झाली होती.

आज आपल्या देशामध्ये हजारो गरीब विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करण्याकरिता शहराकडे जातात आणि हलाखीच्या परिस्थितीत कशाप्रकारे यशस्वी होतात हेच आपल्याला बिरदेव ढोणे यांच्या संघर्षातून जाणवले आहे.

शासनाने ग्रामीण भागातून आलेल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना योग्य सुविधा पुरवल्यास नक्कीच ग्रामीण विद्यार्थी सुद्धा यश संपादन करू शकतात हेच याच्यातून सिद्ध होते असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. रियाज पठाण यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे