Breaking
ब्रेकिंग

श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सांगळेगल्ली येथे भावनायोग प्रशिक्षण संपन्न

0 7 6 9 3 7

श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सांगळेगल्ली येथे भावनायोग प्रशिक्षण संपन्न

सेनि पो . नि . शिरीष बेगडे यांचा कौतुकास्पद उपक्रम

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

भावनायोग प्रवर्तक गुरुदेव 108 प्रमाणसागरजी मुनिश्री यांच्या प्रेरणेने अहिल्यानगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सांगळेगल्ली येथे भावनायोग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षक शिरीष बेगडे सेनि पोलीस निरीक्षक यांनी भावनांची शक्ती, स्वरूप आणि शरीर, मन आणि आरोग्य यावर होणारा परिणाम बाबत विस्तृत माहीती दिली व वैज्ञानिक विश्लेषण केले.त्यानंतर, मुनिश्रींचा विद्यार्थ्यांसाठी सात मिनिटे भावनायोगाचा सराव करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. अजयजी महाजन यांनी सर्वांना भावना योगाच्या उपयुक्तते बद्दल प्रेरित केले. गुरुदेवांच्या अपार कृपेने, कार्यक्रम मोठ्या आनंदाने पूर्ण झाला. यावेळी सर्वश्री निंबाळकर, गायकवाड सर, मेढे सर , सुश्री क्षिरसागर, पिंपरे मॅडम  उपस्थित होते.

आभार प्रदर्शन ढगे मॅडम यांनी केले. कार्यक्रमास श्री. राजेंद्र वायकर, सौ. भाग्यश्री वायकर, श्री. राजेंद्र महंत, सौ. आशिका महंत यांचे सहाय्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे