सेवाभावातून समाजाला आधार – मंत्री गुलाबराव पाटील
मंत्री गुलाबराव पाटील व आयजी दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते गरजू व अनाथ मुलांना किराणा कीट वाटप

प्रतिनिधी :- पंकज पाटील
जळगाव :- दिनांक ५ जानेवारी संकटाला न घाबरता सक्षमपणे सामोरे जाण्याची जिद्द बाळगा. “गरजू आणि अनाथ व्यक्तींना आधार देणे म्हणजे त्यांच्या आयुष्यात नवी ऊर्जा निर्माण करणे होय. सेवाधर्म ही आपल्या संस्कृतीची ओळख असून अशा कार्यातून समाजाला प्रेरणा मिळते. सामाजिक बांधिलकीतून पुढे येणाऱ्या अशा उपक्रमांनी समाजाला नवीन दिशा मिळते, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सेवाधर्म परिवार व संस्रोत ग्रीन टेक्नॉलॉजीचे संचालक जितेश राजपूत यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयजी दत्तात्रय कराळे हे होते.
याप्रसंगी आयजी दत्तात्रय कराळे यांनी यावेळी बोलताना सांगितले, “समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सामूहिक प्रयत्नांतूनच आपल्याला समाजाचा विकास साधता येईल.स्वतःच्या पायावर उभे राहण्याचीही जिद्द ठेवावी. शिधा सोबत उर्जा, विचार व अनुभव सोबत घेवून जां. अशा उपक्रमांमुळे गरजूंना दिलासा मिळतो.
किराणा कीट वितरण
संस्रोत ग्रीन टेक्नॉलॉजीचे संचालक जितेश राजपूत यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त गरजू आणि अनाथांना किराणाचे कीट मंत्री गुलाबराव पाटील आणि आयजी दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे या व्यक्तींना आर्थिक मदत मिळाली आणि त्यांच्या जीवनातील काही अडचणी कमी होतील.
*कु. कोमल पाटील आणि सपना राजपूत यांचा सत्कार*
यावेळी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वडिलांचे क्षत्र हरविले असतांना जिद्दीने महिला फौजी झाल्याबाद्दक्ल कु. कोमल पाटील व सासूचा सांभाळ करीत जिद्दीने व्यवसायात यशस्वी झाल्याबद्दल सपना राजपूत यांचा मंत्री गुलाबराव पाटील व आयजी दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक चंद्रशेखर नेवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जितेश राजपूत यांनी मानले. यावेळी डॉ. नेहा भंगाळे, डॉ. धर्मेंद्र पाटील, भारती कुमावत, चंद्रशेखर कापडे, डॉ.निलिमा सेठानी, आप्पा नेवे, योगिता बावस्कर, अरुणा नेवे, नितीन महाजन, वंदना पवार, कोमल पाटील, सपना राजपूत , मुकुंदराव नन्नवरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जितेश राजपूत अनिल पाटील दुर्गादास पाटील नितीन महाजन विक्रम कापडणे यांच्यासह सेवाधर्म परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.