Breaking
ब्रेकिंग

करमाळा होमगार्ड पथकामध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

0 8 6 5 0 9

करमाळा होमगार्ड पथकामध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

करमाळा(विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी)

करमाळा होमगार्ड पथकांमध्ये बहिण-भावाचे अतुट नाते सांगणारा रक्षाबंधन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.करमाळा होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड पथकामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सार्जन्ट महीला होमगार्ड जयश्री कांबळे, सेक्शन लिडर सारिका बिडकर ,प्रभा दिक्षीत,किशोरी शेंडगे,सरोजनी परदेशी,शैला बुटे,सुवर्णा गायकवाड ;मनिषा कांबळे यांनी करमाळा होमगार्ड पथकातील सर्व पुरूष होमगार्डसना बहिण-भावंडांचे प्रेमाचे प्रतीक असलेली रेशीम धाग्याची राखी बांधून आपले अतुट नाते निर्माण केले. यावेळी होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी,पलटन नायक दिपक जव्हेरी,पलटन नायक महेश शहाणे,सार्जन्ट प्रविण महिंद्रकर,सेक्शन लिडर संदिप परदेशी,सोभनाथ ढेपे,पंकज अंदुरे,
अ.सेक्शन लिडर दिपक घाडग,सद्दाम तांबोळी,होमगार्ड संभाजी कोळेकर,संतोष कुकडे,जावेद काझी,नारायण वायकुळे,संजय कोळेकर,आशोक कांबळे,गणेश साखरे;राहुल पवार,अतुल महाडिक,तुकाराम सोरटे,शकिल पठाण,गणेश शहाणे,ज्ञानेश्वर मचाले,अमोल गणगे,समाधान हानपुडे,विशाल नलवडे,तेजस महारनवर,बिभीषण टकले,नवनाथ मोरे,प्रदिप लाळगे,आदि होमगार्ड सह सेवानिवृत्त सेक्शन लिडर होमगार्ड दादा शिंदे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित होमगार्डना मार्गदर्शन करताना तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी म्हणाले की,होमगार्ड संघटनेतील सदस्यांमध्ये जोश व उत्साह वाढावा त्यासाठी आपल्या पथकामध्ये आपण वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करत असतो;आणि आपले होमगार्ड पथक हे एक आपला परिवार समजुन आपण वागत असल्याने परिवारातील महीला होमगार्ड व पुरूष होमगार्ड यांच्यामध्ये बंधुत्वाची व आपुलकीची प्रेरणा वाढविणारा रक्षाबंधन हा सण असल्याने,यामुळे होमगार्ड संघटनेतील एकोपा व शिस्त,संघटनेचे ध्येय धोरण हे सांभाळणे सर्वांनाच सोपे होणार आहे. महीला होमगार्ड भगिणींनी राखी बांधल्यामुळे आता आपणा सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या होमगार्ड संघटनेची शिस्त,शिकवण,ध्येय धोरणे,आदर्श व आदेश व सुचना आणि बंधुत्वाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन शेवटी जव्हेरी यांनी केले .

करमाळा होमगार्ड पथकातील सर्व पुरूष होमगार्ड यांनी स्वयंस्फुर्तीने महीला होमगार्डना भावाची भेट म्हणून मानाची साडी-चोळी भेट दिली. यावेळी महीला होमगार्ड भगिणी भावुक झाल्या होत्या व त्यांनी आनंदाने ही भेट स्वीकारून या अतुट नात्याला धन्यवाद देवून सर्वांसाठी आल्पोपहार देत रक्षाबंधन सण साजरा केला.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे