Breaking
ब्रेकिंग

एक पेड माँ के नाम संकल्पनेतून दुर्गादास शेगेकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

0 8 6 6 8 2

एक पेड माँ के नाम संकल्पनेतून दुर्गादास शेगेकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

राहुरी तालुका जावेद शेख

भारतीय जनता पार्टीच्या “एक पेड माँ के नाम” या प्रेरणादायी संकल्पनेतून भाजप किसान मोर्चाचे वरुड (जि.अमरावती) शहर अध्यक्ष दुर्गादास शेगेकर यांचा वाढदिवस लहान न्यू इंग्लिश स्कूल, वरुड (जि.अमरावती) येथे अत्यंत अनोख्या आणि सामाजिक उपक्रमांनी भरलेल्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

या विशेष प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या छोट्या हातांनी वृक्षारोपण करण्यात आले. “आईच्या नावे एक झाड” ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवून निसर्गसंवर्धनाचा महत्वाचा संदेश देण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

दुर्गादास शेगेकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने वाढदिवसाचे औचित्य समाजहिताच्या दिशेने वळवले. निसर्गरक्षण, शिक्षणप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला हा उपक्रम उपस्थितांनी विशेष उल्लेखनीय ठरवला.

कार्यक्रमाला प्रामुख्याने संजय उर्फ योगेश्वर खासबागे डॉ निलेश बेलसरे देवेन्द्र खेरडे मुरलीधर पवार राजु सुपले आकाश भोजने निलेश मानकर न्यु इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका कोमल पांडव व शाळेतील शिक्षकवृंद, पालक, भाजपा कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन योगेश्वर खासबागे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुरलीधर पवार यांनी केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे