Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी…

0 7 9 8 9 9

गुंडेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी…

वाळकी / प्रतिनिधी :  दादासाहेब आगळे

बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने अण्णा भाऊंच्या फोटोला अभिवादन करण्यासाठी गर्दी करण्यात आली होती.
यावेळी डॉ.विलास सकट, अनिल सकट यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर माजी सभापती अभिलाष पाटील घिगे, भाजपा तालुकाध्यक्ष युवा नेते दादासाहेब दरेकर,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बबनराव हराळ पाटील, पोलिस उपनिरीक्षक शरद जावळे,जेष्ठ नागरिक विठ्ठल भापकर गुरुजी,माजी उपसरपंच संतोष भापकर,विकास शिर्के, ग्रामपंचायत सदस्य सुनिल भापकर, शिवनाथ कोतकर,सतिश चौधरी, जयसिंग कोतकर,गणपत हराळ, भवानीप्रसाद चुंबळकर,दिनकर शिंदे,पोपट हराळ,अशोक देशमुख,संतोष कोतकर, सत्यवान कोतकर,सुरज पवार, विनोद सकट आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात बोलताना घिगे यांनी अण्णाभाऊ साठे यांनी खऱ्या दलित तसेच सर्व जातीसाठी काम करत असताना आपल्या लेखनातून वाचा फोडण्याची चळवळ उभा करून फकीरा कादंबरी ही आज जगात पोहचली आहे.त्याचा आज आपल्या सर्वांना अभिमान आहे.तसेच दादा दरेकर यांनी बोलताना सांगितले की अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शाहीरीच्या माध्यमातून खेडोपाडी तसेच जगभरात पोहचण्याचे महान कार्य करुन एक लोकशाहीर व शिवशाहीर म्हणून मोठा इतिहास घडवण्याचे काम केले आहे.महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांच्या कार्यामुळे आणि विचारांमुळे अनेक लोक आजही प्रेरित झाले आहेत.असे त्यांनी सांगितले. मान्यवरांमध्ये सतिश चौधरी,संतोष भापकर यांनी आपले विचार भाषणातून व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.विलास सकट यांनी सर्वांचे आभार मानले..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे