Breaking
ब्रेकिंग

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सिनेट व विद्यापीठ बांधिल आहे- विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ .रमेश गायकवाड

0 7 6 9 4 2

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सिनेट व विद्यापीठ बांधिल आहे- विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ .रमेश गायकवाड

राहुरी तालुका जावेद शेख

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यास सिनेट व विद्यापीठ बांधील आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आधी सभा सदस्य रमेश गायकवाड यांनी केले. बुधवार दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील अधिसभा सदस्य डॉ.रमेश गायकवाड व तसेच अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.बिबवे, न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर चे श्री. मगर यांनी तालुक्यातील बेलापूर येथील महाविद्यालयात भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, सिनेटमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, अभ्यासक्रम व अभ्यास मंडळे यांच्या प्रश्नांची दखल घेऊन प्रश्न सोडविले जातात. त्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु, परीक्षा विभाग व सर्व प्रशासनाची मदत होते असेही ते म्हणाले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी नवीन शैक्षणिक धोरण व अंमलबजावणी यावर भाष्य केले. प्राध्यापक भरती झाली तर नवीन शैक्षणिक धोरणातील बरेच प्रश्न सुटतील असेही त्या म्हणाल्या.
डॉ. कोकाटे यांनी डॉ. गायकवाड यांचा सत्कार. केला तसेच अभ्यास मंडळाचे डॉ. बिबवे यांचा सत्कार डॉ. विनायक काळे यांनी केला तर डॉ. शरद मगर यांचा सत्कार प्रा. प्रकाश देशपांडे सर यांनी केला.
या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बाबासाहेब पवार डॉ. संजय नवाळे , प्रा. गायकवाड व्ही. एम. व डॉ. सदाफुले व्ही. बी. उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब पवार यांनी केले तर आभार प्रा. देशपांडे सर यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे