ओढ्यातील गुरुदत्त मंदिरात १४ डिसेंबरला दत्त जयंती उत्सव
ओढ्यातील गुरुदत्त मंदिरात १४ डिसेंबरला दत्त जयंती उत्सव
नगर / प्रतिनिधी
नगर-मधील नगर पुणे रोडवरील ओढ्यातील गुरुदत्त मंदिर,गोंडाळ मळा,चास येथे दत्त जयंती निम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केडगावच्या पुढे असलेले हे मंदिर पुरातन क्षेत्र असून ओढ्यात असून दोन्ही बाजूने डोंगर आहे व मध्ये दत्तक्षेत्र आहे. त्यामुळे मंदिराला ओढ्यातील दत्त मंदिर असे नाव पडले आहे. मंदिराच्या मागे बंद खदान असून तिथे तळे निर्माण झालेले आहे,त्यामुळे हे धार्मिक बरोबर पर्यटन स्थळ देखील आहे,नगर-पुणे रोडवरील प्रवासी,कुटुंब शेकडो वर्षांपासून येथे दर्शनासाठी व विश्रांतीसाठी येथे थांबतात,दर गुरुवारी रात्री आरतीसाठी नगरकर व परिसरातील भाविक मोठ्या संख्नेने येथे येतात .
उत्सवा निमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा सुरु झाला असून तो दि १४ डिसेंबर पर्यंत होणार असून दत्त जयंतीला १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ पर्यंत श्रीं दत्तगुरूंचा महाअभिषेक सोहळा,नंतर दुपारी १२ ते ३ भजन कार्यक्रम व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्री.प्रसाद महाराज देव,शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराज यांचे एकनिष्ठ भक्त नरहर सिद्ध(दादास्वामी)यांचे १३ वे वंशज यांच्या मधुर वानिने श्री दत्त संगीत जन्म कथा व दत्त नामाचा नामजप होऊन सायंकाळी ठीक ६ वाजता श्रींचा पाळणा होऊन दत्त जन्म उत्सव साजरा होईल. दत्त जन्म झाल्या नंतर सायं ७ ते ९ भजन होईल.तसेच दिवसभर साबुदाणा खिचडी चा महाप्रसाद वाटप होणार आहे
दिनांक १५ डिसेंबर ला दुपारी १२ वाजल्या पासून सायंकाळी ५ वाजे पर्यंत महाप्रसाद संपन्न होणार आहे. तरी नगर पुणे रोड वरील गुरुदत्त मंदिर, गोंडाळ वस्ती,चास,अहिल्यानगर.येथे सर्व कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन भाविक,भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .
कार्यक्रमासाठी शहरांसह राज्यातून भाविक,भक्त मोठ्या संख्येने दरवर्षी येथे येतात,सकाळपासून ते रात्रीपर्यंत भाविक दर्शनासाठी गर्दी करतात तसेच या ठिकाणी वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात,तर दर गुरुवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते,मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला,म्हणून त्या दिवशी सर्व दत्ताचा मंदिरात जन्मोत्सव साजरा केला जातो.