Breaking
ब्रेकिंग

डॉ. सालीमठ नेतृत्वात साखर उद्योग अधिक प्रगत होईल : डॉ. उद्धव शिंदे

0 3 9 0 4 8

डॉ. सालीमठ नेतृत्वात साखर उद्योग अधिक प्रगत होईल : डॉ. उद्धव शिंदे

स्नेहबंधतर्फे नूतन साखर आयुक्तांचा सत्कार

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर – राज्याचे साखर आयुक्त डॉ. सिद्धाराम सालीमठ त्यांच्या नेतृत्वात साखर उद्योग अधिक प्रगत आणि कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी व्यक्त केली. स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी डॉ. सालीमठ यांची त्यांच्या दालनात भेट देऊन त्यांचा शाल, पुस्तक देऊन सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. सालीमठ यांनी त्यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यात नगर राज्यात पहिल्या स्थानावर होता. तसेच प्रशासन गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावरही त्यांनी भर दिला. त्यामुळेच ई-ऑफीसच्या अंमलबजावणीत जिल्हा अग्रेसर राहिला. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील वैयक्तिक लाभार्थी मंजूर प्रकल्प संख्येनुसार जिल्हा गतवर्षी प्रथम क्रमांकावर होता. महाडीबीटी पोर्टलवर  १ लाखाहून अधिक शेतकर्‍यांना लाभ देणारा अहिल्यानगर हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. तसेच काम ते साखर आयुक्त म्हणून करतील, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे