Breaking
ब्रेकिंग

राहुरीत दिव्यांग संघटनेच्या सहकार्याने बेघर अंध मनोरुग्ण महिलेला माऊली सेवा फाऊंडेशनकडे केले स्वादिन – मधुकर घाडगे

0 8 6 7 0 5

राहुरीत दिव्यांग संघटनेच्या सहकार्याने बेघर अंध मनोरुग्ण महिलेला माऊली सेवा फाऊंडेशनकडे केले स्वादिन –
मधुकर घाडगे

राहुरी तालुका जावेद शेख

दिव्यांग शक्ती सेवा संस्था व प्रहार दिव्यांग संघटनेचे टाकळीमिया शाखा उपाध्यक्ष विष्णू ठोसर हे राहुरीत शनी मंदिर जवळ चप्पल शिवण्याचे व्यवसाय करतात शुक्रवार दिनांक 1ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 11वाजता वाजता एक बेघर अल्पदृष्टी दिव्यांग मनोरुग्ण तिचे नाव छाया खंडू माळी पाचेगाव असे सांगते वय 50 वर्षे तिला शनी मंदिर राहुरी या ठिकाणी कोणीतरी सोडून गेले व ती भीक मागायला लागली खायची राहायची व्यवस्था नाही. तिला गावातील जवळच्या लोकांनी खाण्यापिण्यास दिले शनी चौकात रस्त्याच्या कडेला रात्रभर झोपली म्हणून विष्णू भाऊ ठोसर व त्यांचे सहकारी 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजता दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे यांना संपर्क केला ते त्याचे सहकारी अनिल तनपुरे, योगेश लबडे, सलीम भाई शेख, जालिंदर भोसले ,विजय म्हसे,जालिंदर हिवाळे,गोरख देवरे ,बाळासाहेब गांडाळ, संदिप बोरसे, सुखदेव कीर्तनेत्या ठिकाणी आले त्या महिलेची चौकशी केली व तांदुळवाडी येथील कृपा वृद्धाश्रम चे संचालक किरण गायकवाड सर यांना संपर्क करून त्या महिलेला रिक्षातून कृपा वृद्धाश्रम तांदूळवाडी येथे सोडून माणुसकीच्या नात्याने पालक म्हणूनफॉर्म भरून दिला. त्यानंतर संध्याकाळी सरांचा फोन आला तिला इथे ठेवता येणार नाही कारण ती अल्प दृष्टी दिव्यांग आहे तिला तिची दैनंदिन स्वच्छता करता येत नाहीत. तिला औषधोपचाराची गरज आहे डोळ्याचे ऑपरेशनची गरज आहे म्हणून आम्ही देहरे येथील माऊली प्रतिष्ठानचे संचालक डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं पाठवून द्या. म्हणून आम्हाला असे वाटले या गोष्टीची पोलिस स्टेशनला कल्पना देणे गरजेचे आहे व माऊली प्रतिष्ठान ना पोहोच करण्यासाठी आमच्याकडे गाडीची व्यवस्था नव्हती म्हणून आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांची भेट घेतली त्यांनी सांगितलं हे काम महिला बालकल्याण समाज कल्याण कडे आहे त्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी फोन रिसीव केला नाही म्हणून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाईक तहसीलदार सौ.संध्या दळवी मॅडम यांच्याशी संपर्क केला त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल चे 108 ॲम्बुलन्स चे डॉक्टर प्रवीण क्षीरसागर संपर्क केलाअसता तिला त्यांनी माऊली प्रतिष्ठान संपर्क करून संपर्क करून सांगितले की ॲम्बुलन्स मुळे ती महिला घाबरत आहे म्हणून आपली गाडी पाठवा नंतर माऊली प्रतिष्ठानचे डॉक्टर राजेंद्र धामणे यांनी आपली 5 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता गाडी पाठवली त्या महिलेला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले व त्यांना सांगण्यात आले या महिलेची देखभाल ऑपरेशन करावी ही विनंती करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले . प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ति सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या महिलेला सुखरूप माऊली प्रतिष्ठान कडे स्वाधीन केले.त्याबद्दल राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब व नाईप तहसीलदार संध्या दळवी मॅडम यांच्यावतीने बुके शाल देऊन सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे