महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदविज्ञान विभागांतर्गत परिसंवादाचे आयोजन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदविज्ञान विभागांतर्गत परिसंवादाचे आयोजन
राहुरी वृत्तसेवा / जावेद शेख
भारतीय मृदा विज्ञान विभाग , आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेती आणि उपजीविकेच्या सुरक्षेसाठी मृदा व्यवस्थापन या विषयावर दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत घेण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत मृदा विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मधील प्रयोगाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. विभागाचे प्राध्यापक डॉ. रितु ठाकरे, डॉ. बी. डी. भाकरे, डॉ. एस. आर. शेळके तसेच विभग प्रमुख डॉ.बी.एम कांबळे यांच्या मार्गदरशनाखाली आचार्य पदवीची विद्यार्थिनी कु. सायली बिरादार, हिने पोस्टर सादर केले.
निवडक भू-वापर प्रणालींमध्ये मातीतले बुरशीजन्य समुदाय आणि कर्ब व नत्र यांच्यातील संबंधांचा शोध घेण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या प्रयोगाचे निकाल ह्यात सादर करण्यात आले. सिद्ध बुरशीजन्य प्रजाती कर्ब व नत्र वाढवण्याच्या दृष्टीने वापरले जाऊ शकते अशी शिफारस करण्यात आली. ह्या स्पर्धेचे परीक्षण चारही विद्यापीठातून आलेल्या प्राध्यापकांच्या समितीने केले.
यावेळी चारही कृषी विद्यापीठातून आलेले शास्त्रज्ञ प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मृद विज्ञान विभागातील कृषी सहाय्यक श्री भारत हरिश्चंद्रे , प्रसाद आढाव तसेच रणजीत पाटील यांनी विशेष असे परिश्रम घेतले