संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
कुर्डूवाडी: दि. २८/ कुर्डूवाडी येथील संजयमामा शिंदे विद्यालय मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. सी. व्ही. रामन तसेच विज्ञानामध्ये योगदान देणाऱ्या इतर वैज्ञानिक व्यक्ती यांच्या कार्याबद्दल तसेच जगभर विज्ञानातून मानवाने कशाप्रकारे प्रगती केली यावरती शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विज्ञान अध्यापन करणाऱ्या शिक्षक भगिनी यांचा सन्मान प्रशालेतर्फे करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे संस्थेचे सचिव रोहन टोणपे, कोषाध्यक्ष डॉ. श्री रोहित टोणपे यांनी कौतुक अभिनंदन केले.



