Breaking
ब्रेकिंग

नि:स्वार्थ सेवाभाव हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र : भास्करगिरी महाराज

डॉ. उद्धव शिंदे यांचा महंत भास्करगिरी महाराजांनी केला सन्मान

0 3 9 0 5 1

नि:स्वार्थ सेवाभाव हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र : भास्करगिरी महाराज

डॉ. उद्धव शिंदे यांचा महंत भास्करगिरी महाराजांनी केला सन्मान

एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क

अहिल्यानगर – इतरांसाठी नि:स्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. नि:स्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड चे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.
गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराजांकडून सन्मान नेवासा तालुक्यातील देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, ज्येष्ठ नागरिक, आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. महंत भास्करगिरी महाराज म्हणाले, आपण आपल्या आचरणात नेहमीच सेवेची भावना ठेवावी, जेणे करून इतरांना प्रेरणा मिळेल. सेवेची भावनाच हा आपल्यासाठी आत्मसंतोषाचा केवळ वाहक न ठरता, आपल्या संपर्कात येणाऱ्या अनेक व्यक्तीमध्ये चांगुलपणा संदेश सदोदित पसरवित असतो आणि समाजाला एक नवी दिशा  देण्याचे कार्य करीत असतो .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे