Breaking
ब्रेकिंग

पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी:- ८,११,२५०/- रूपये किंमतीचा गांजा केला जप्त

0 7 6 9 5 1

पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी:- ८,११,२५०/- रूपये किंमतीचा गांजा केला जप्त

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. ०६/ करमाळा पोलीसांनी दमदार कामगिरी करीत ८,११,२५०/ रूपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. सदर कारवाई १ संप्टेंबर रोजी सकाळी ११/४० वा. चे. सुमारास रणजीत माने पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे यांनी व त्यांचे पथकांनी केलेली आहे.

सदर हकिगत अशी कि, दि. ०१/०९/२०२५ रोजी सकाळी ११/४० वा चे सुमारास पोसई/सुशिलकुमार पाखरे, यांना गोपनिय बातमी मिळाली कि, मौजे केम ते कंदर रोडणे केम कडुण तीन इसम स्कुटर, चारचाकी वाहणात असुन ते गांजा विक्री साठी घेवुन येणार आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदर बाबत पो.ना. पवार यांनी आम्हांस दिली. सदर बाबत आम्ही स्वतः अंजना कृष्णा व्ही. एस. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. करमाळा उपविभाग यांना माहीती दिली व सदर बातमीतील माहीती प्रमाणे कारवाई करीता लागणारी लेखी अधिकार पत्र घेवून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून आम्ही स्वताः शासकिय पंच पोलीस स्टाफ असे मौजे कंदर कडे रवाना झालो. सदर ठिकाणी गेल्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे केम कडुन कंदर जाणारे रोडवर जावुन थांबलो असता केम कडुन कंदर च्या दिशेने एक बिगर नंबरवी स्वीप्ट कार व एक बिगर नंबरची अॕक्टीव्हा स्कुटर येताणा दिसली. त्याचा आम्हांस मिळालेल्या बातमी प्रमाणे संशय आला त्यावेळी आम्ही त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते थांबले नसल्याने आम्ही त्याचा पाठलाग केला असता त्यांनी त्याची वाहणे मौजे कंदर हट्टीतील केम कंदर रोडवर डावीकडे वळवुन विजय नवले यांचे घराकडे जाणारे कच्चा रोडणे जात असताना त्यांना जागी थांबविले. त्यावेळी ती वेळ १६/५५ वा ची होती. त्वरीत पोलीस स्टाफने सदर इसमास घेराव टाकुन आम्ही स्वताः व सोबतचे पंचानी व पोलीस स्टाफचा पुर्ण परीचय देवुन आपले ओळखपत्र दाखवुन पोलीस असल्याचे आम्ही परीचय दिला व त्यांना ताब्यात घेतले.

सदर इसमा पैकी अॕक्टीव्हा स्कुटर चालवित असलेल्या इसमास त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव सचिन नागनाथ निवाळ वय २६ वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर असे सांगितले. त्यांचे पाठिमागे स्विप्ट कार मध्ये असलेल्या इसमास त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांने त्यांचे नाव आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी वय २६ वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर व त्याचे सोबत दुस-या इसमास नाव विचारले असता सचिन सुरेश बावळे वय ४० वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर असे असल्याचे सांगितले.

सदर बातमीतील दोन्ही वाहणात आम्ही स्वताः पंचासमक्ष सदर वहानाची तपसणी केली असता, यांचे ताब्यातील बिगर नंबरवी अॕक्टीव्हा गाडीचे डिक्कीत त्यांनी उघडुन दाखवली असता त्यात एक चिकटपट्टीने पॅक केलेले पाकीट सापडले, तसेच स्वीप्ट गाडीची डिक्की उघडुन दाखवले असता सदर डिक्की मध्ये चिकटपट्टीने पॅक केलेले पाच पाकीट मिळून आले. सदर सहा पाकिटे पंचा समक्ष आम्ही स्वताः व पंच यांनी उघडुन पाहिली असता त्यात झाडपत्ती सारखा ओलसर व उग्र वास येणारा गांजा असल्याचे दिसुन आले. असे एकुण सहा पाकीटे दोन्ही वाहणाचे तपासणी करून मिळून आले. त्याचे वजन १३ किलो ४५० ग्रॅम होते. प्रति किलो अंदाजे भाव २५,०००/- प्रमाणे ३,३६, २५० रु. किंमतीचा गांजा मिळून आला व सदर इसमाकेडे अॕक्टीव्हा स्कुटर ची किंमत ७५,०००/- व स्वीप्ट गाडी ची किंमत ४,००,०००/- असे एकुण ८,११, २५० आठ लाख अकरा हजार दोनशे पन्नास रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदर बाबत पो.ना. ११६२ मनिष पवार यांनी आरोपी नामे सचिन नागनाथ निचाळ, आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी व सचिन सुरेश बावळे यांचे विरूध्द सरकार तर्फे फिर्याद दिली असुन गु.र.नं. ७२५/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस अॕक्ट कलम ८ (क) २० (ब) (11) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.) अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस., करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई. / सुशिलकुमार पाखरे, स.पो.फौ. शिनगारे, पो.हे.कॉ. आप्पासाहेब लोहार, पो.हे.कॉ. अजित उबाळे, पो.ना. मनिष पवार, पो‌.ना‌‌. वैभव ठेंगल, पो.कॉ. रविराज गटकुळ, पो.कॉ. मिलीद दहीहांडे, पो.कॉ. अर्जुन गोसावी, पो.कॉ. येवले, पो.कॉ. भराटे, पो.कॉ. रंदिल, पो.कॉ. खोटे, पो.कॉ. प्रसाद काटे तसेच सायबर पो. ठाणे कडील पो.हे‌.कॉ. व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे हे करीत आहेत.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे