Breaking
ब्रेकिंग

आ. संजय मामा शिंदे यांना 2024 विधानसभा निवडणुकीत जनतेचा वाढता उत्साह व प्रतिसाद

विधानसभा निवडणुकीत प्रथमच अंडर करंट पाहतोय; आमदार संजयमामा शिंदे यांचे कंदरच्या सभेत भाष्य

0 3 9 0 5 0

आ. संजय मामा शिंदे यांना 2024 विधानसभा निवडणुकीत जनतेचा वाढता उत्साह व प्रतिसाद

विधानसभा निवडणुकीत प्रथमच अंडर करंट पाहतोय; आमदार संजयमामा शिंदे यांचे कंदरच्या सभेत भाष्य

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १५/ 2024 विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार संजयमामा शिंदे यांच्या कॉर्नर बैठका व जाहीर सभांचे सत्र सुरू असून त्याला उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळत आहे. मतदारांच्या या उत्साहाबद्दल वाढत्या प्रतिसादाबद्दल बोलताना आ. शिंदे म्हणाले की, 2014 पासून ही माझी तिसरी विधानसभा निवडणूक आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा निवडणूकही मी पाहिली आहे. परंतु प्रथमच 2024 च्या या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत मी अंडर करंट पाहतोय. वरकटणे या छोट्याशा गावाने मला 2019 साली अवघी 184 मते दिली होती. त्याच गावात परवाच्या वरकटणे येथील सभेला मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक होता. आज कंदर येथील सभेलाही असाच प्रतिसाद मिळत आहे. मतदारांनीच आता निवडणूक हातात घेतलेली असून येत्या 23 तारखेला त्याचा रिझल्ट निश्चितच दिसेल असे भाष्य आमदार संजयमामा शिंदे यांनी कंदर येथील सभेप्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर निळकंठ देशमुख, चंद्रकांत सरडे, विलास पाटील, अण्णासाहेब पवार, नानासाहेब लोकरे, एड. नितीन राजे भोसले, कन्हैयालाल देवी, एड. शिवराज जगताप, संजय घोलप, गणेश चिवटे, हनुमंत मांढरे पाटील, तानाजी झोळ, प्रवीण जाधव, विवेक येवले, एड. अजित विघ्ने, सूर्यकांत पाटील, अमोल काळदाते आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. संजयमामा शिंदे म्हणाले की, मी चंद्र, सूर्य देईन मी सोन्याचा धूर काढीन अशी वलगना मी कधीच करत नाही. मी तोलून बोलतो, जे बोलतो ते करून दाखवतो. जी होण्याची शक्यता आहे तेच मी बोलतो, अवास्तव कधी बोलत नाही. त्यामुळे मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही. भलेही माझ्याकडून दोन विकासकामे राहिली असतील ती भविष्य काळामध्ये मी करेल परंतु कोणाचंही वाईट माझ्या हातून घडलेलं नाही असे वक्तव्य यावेळी बोलताना आमदार संजय मामा शिंदे यांनी केले.

यावेळी जयवंतराव जगताप गटाचे अण्णासाहेब पवार यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला, तर नानासाहेब लोकरे यांनी बागल गटामधून शिंदे गटात प्रवेश केला. या सर्वांचा आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कंदर येथील या सभेला जनतेने संजय मामा शिंदे यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे