महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार संघटनेच्या करमाळा तालुका सह संघटक पदी रोहित सोरटे यांची निवड*

*महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार संघटनेच्या करमाळा तालुका सह संघटक पदी रोहित सोरटे यांची निवड
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ३/ करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित अभिमान सोरटे यांची महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेच्या करमाळा तालुका सहसंघटक पदी निवड करण्यात आली. माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाषजी वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष वसेकर साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी श्री देवीचा माळ येथील समस्त गावकरी मंडळी, ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. श्री सोरटे यावेळी बोलताना म्हणाले की माहिती अधिकार पदाचा वापर सर्वसामान्य शेतकरी मायबाप जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करेन. मी करमाळा तालुक्यातील गोरगरीब जनता सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या पदाचा मी नक्कीच वापर करणार व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार.