नवी मुंबई सुवर्णकार मंडळाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून प्रविण बाळासाहेब भामरे यांची एकमताने निवड
नवी मुंबई सुवर्णकार मंडळाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून
प्रविण बाळासाहेब भामरे यांची एकमताने निवड
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
नवीन पनवेल येथे रविवार दि.१२/१/२५रोजी नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची त्रैमासिक सभेचे आयोजन मंडळाचे कार्यालय, सेक्टर वन/एस, प्लाँट नं.१३६/बी, शबरी हाँटेलजवळ ,नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेत सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज आणि मंडळाचे अध्यक्ष कै.संजय गजानन शेठ खरोटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सभेचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव हेमकांत सोनार यांनी केले.सुरुवातीला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच कै.संजय गजाननशेठ खरोटे याचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले.
सदर प्रास्ताविकात कै.संजय खरोटे यांनी केलेल्या कामाची माहिती व नवी मुंबई सुवर्णकार
“समाज भवन ” या महत्वाकांक्षी स्वप्नपूर्ती उपक्रमासाठी सिडको ते मंत्रालय न्याय मागण्यांसाठी मंडळासाठी दिलेले योगदान याविषयी माहिती सांगितली.
कै.संजय खरोटे यांचा कार्यकाळ सन २०२०-जून-२५ पर्यंत होता. पण त्यांच्या अचानक निधनामुळे रिक्त जागी हंगामी अध्यक्ष म्हणून मंडळाच्या घटनेनुसार उपाध्यक्ष प्रविण बाळासाहेब भामरे यांची हंगामी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष म्हणाले की, कै.संजय खरोटे साहेब यांनी दिलेला लढा हा समाजासाठी तसेच माझ्या साठी प्रेरणादायी होता. त्यांचे स्वप्न पुर्ण करणे हे माझे उद्दिष्ट राहील,तसेच बांधकाम निधी, आजीव सभासद वाढविण्यासाठी सर्वाचे प्रयत्न इ. चर्चा करण्यात आली.
यावेळी मंडळाचे कोषाध्यक्ष विजयजी भामरेसाहेब,महिला मंडळ अध्यक्षा संगिताताई विसपुते,सहसचिव सी. डी. मोरे,मनोज सोनार ,उदय विभांडिक, अँड.शाम विसपुते, मिलिंद खरोटे,विश्वास खरोटे, दिपक वाघ, बापुराव भामरे, किशोर वडनेरे आदी यावेळी उपस्थित होते.