Breaking
ब्रेकिंग

महावितरणा विरोधातील रस्ता रोको आंदोलन यशस्वी…

महावितरणाचे अभियंता सपकाळ यांच्या आश्वासनाने रास्ता रोको आंदोलन स्थगित...

0 3 9 0 2 3

महावितरणा विरोधातील रस्ता रोको आंदोलन यशस्वी…

महावितरणाचे अभियंता सपकाळ यांच्या आश्वासनाने रास्ता रोको आंदोलन स्थगित…

एस डब्ल्यू न्यूज / ब्यूरो रिपोर्ट

नगर :    महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांना विज मोफत घोषणा करण्यात आली आहे. परंतु नगर तालुक्यातील महावितरणाचे रुईछत्तीसी सबस्टेशन अंतर्गत दहिगाव, शिराढोण, साकत खुर्द, साकत बुद्रुक, वाटेफळ, पारगाव,वडगाव तांदळी,रुईछत्तीसी, या सर्व गावातील शेतकरी आज दहिगाव येथे राष्ट्रीय महामार्ग रस्तावर उतरुन रास्ता रोको आंदोलन केले.

या वेळी शेतकरी आक्रमण झाले होते. जो पर्यंत महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू राहील अशी भूमिका घेतल्याने आंदोलन ठिकाणी तणावाची परस्थिती निर्माण झाली होती. नगर सोलापूर रस्ताने आज मंत्री प्रशासकीय अधिकारी कुभेंळ या ठिकाणी तलावाचे भूमीपूजन साठी जाणार असल्याने पोलीस शेतकरी दबाव तंत्र वापरत असल्याने घटना स्थळी परस्थिती चिघळत असल्याचे लक्षात आल्याने पोलीस भुमिका बदली त्यामुळें आज पंचक्रोशीतील शेतकर्यांना आठ दिवसा पूर्वी अहिल्यानगर जिल्हाधिकारी, महावितरणाचेह मुख्य अभियंता यांना सविस्तर तक्रार निवेदन दिले होते. परंतु महावितरणच्या गलथान कारभार मुळे शेती पाणी देणे अशक्य झाले आहे. शेती पिके कांदा गहू हरभरा पाण्या वाचून जळत आहे. त्यामुळे थ्री फ्रेंज लाईट विषय मार्गी लावण्यासाठी आज राष्ट्रीय महामार्ग नगर सोलापूर रस्तावर शेकडो शेतकरी रस्तावर उतरुन थ्री फेज विज सुरळीत सोडावी अशी मागणी शेतकर्यांनी केली या वेळी महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता उमाकांत सपकाळ यांनी आंदोलन स्थळी येऊन शेतकरी चर्चा करून विज सुरळीत सुरू करण्यासाठी आज यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. या आंदोलन स्थळी नगर तालुका पोलीस स्टेशन सा.पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, सह अहिल्यानगर पोलीस चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी शालेय विद्यार्थीच्या शाळा बस वैद्यकीय उपचार साठी अहिल्यानगर जाणार प्रवासी या रास्ता रोको मधून दहिगावातील तरुण वाट करून देत होते. त्यामुळे अत्यावश्यक सुविधा कुठे अडथळा निर्माण झाली नाही. या सहकार्य बदल पोलीसांनी आंदोलकाचे आभार मानले.

या रस्ता रोको आंदोलन वेळी युवा नेते दादासाहेब दरेकर
माजी सरपंच सुनील म्हस्के, , जयवंत शिंदे, मा.सभापती राम साबळे, सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के, रुईछत्तीसी सरपंच रमेश भांबरे, दहिगाव सरपंच मधुकर म्हस्के, महेश म्हस्के,ॲड पोपट म्हस्के, जावेद शेख, गणेश हिंगे, सुनील म्हस्के, बाळासाहेब ठोंबरे, वाटेफळ सरपंच बाबासाहेब अमृते, मा सरपंच रवी अमृते, मा. सरपंच बाबासाहेब चितळकर, पोपट गुंड, रामा चितळकर, सेवा चेरमन विशाल बोचरे,बाळासाहेब हराळ, पोपट पोटरे, बाबासाहेब बनकर, नाना गायकवाड, श्रीधर पवार, संपत वाघमोडे, भाऊसाहेब आन्हाड, तांदळी सरपंच दिपक घिंगे,अनशाबापु म्हस्के,दत्तात्रय बनकर, पारगावचे सरपंच बोठे, सतिश म्हस्के, संतोष गुंड, नागेश वाघ, ठोंबरे सर आदि उपस्थित होते .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे