श्रद्धा, सबुरी, भाजपाची महाभरारी
भाजपा महाराष्ट्र महाविजयी प्रदेश अधिवेशन, शिर्डी
प्रतिनिधी : राहूल फुंदे
श्री सद्गुरू साईबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरी येथे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांचे महाविजयी प्रदेश अधिवेशन संपन्न झाले.
या प्रदेश अधिवेशनात विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीच्या पाठीशी एकजुटीने उभे राहत दिलेल्या मतरूपी आशीर्वादासाठी महाराष्ट्रवासीयांसह निवडणूकीच्या काळात अहोरात्र मेहनत करून महाविजयाचे शिल्पकार ठरलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानण्यात आले.
भाजपा संघटन पर्व अंतर्गत आजवर चाळीस लाखांपेक्षा जास्त महाराष्ट्रवासीयांना भाजपा परिवारात सामील करून घेण्यात यश आले आहे. नमो ॲपवर रेफरल कोड आधारित नोंदणीसाठी असणारी मर्यादा २५० वरून वाढवून ही नोंदणी मर्यादा १००० करण्यात आली आहे, याचा फायदा करून घेत जास्तीत जास्त लोकांना भाजपा परिवारात सामील करून घेण्याचा संकल्प आज हजारो भाजपा कार्यकर्त्यांनी एकमुखाने केला.
या समारंभादरम्यान भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आदरणीय अमितभाई शाह यांचा सत्कार करण्यात आला.
या अधिवेशनप्रसंगी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, आदरणीय केंद्रीय मंत्री पीयूषजी गोयल, केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोहोळ, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री आदरणीय शिवप्रकाशजी, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे, मंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशीष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आणि भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार गोरे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार नारायण राणे, खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासह भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह हजारोंच्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.