क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित चेस स्पर्धेत करमाळ्याच्या मुलींनी मारली बाजी
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. १८/ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित चेस स्पर्धेत करमाळ्याच्या मुलींनी घवघवीत यश प्राप्त केले. करमाळा येथील नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल शाळेच्या विद्यार्थिनी इयत्ता सहावी मधील दूर्वा दादासाहेब नवले व सिद्धी पृथ्वीराज देशमुख या खेळाडूंनी घवघवीत असे यश संपादन केले आहे.
या खेळाडूंना देशमुख क्लासेस येथील प्रशिक्षिका सौ. तेजश्री पृथ्वीराज देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच D.C फाउंडेशनचे संस्थापक पृथ्वीराज संभाजीराव देशमुख यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच करमाळा चेस असोसिएशनचे श्री सचिन साखरे साहेब, श्री महारुद्र माने सर, श्री सचिन दळवी सर, श्री साळुंके सर, श्री शंभू मेरुकर साहेब, विजय दाळवाळे यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंना पुणे विभागस्तरीय स्पर्धेसाठी गुलाब पुष्प देऊन हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. सिद्धी देशमुख व दुर्वा नवले या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



