Breaking
ब्रेकिंग

क.जे.सोमैया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0 3 9 0 3 0

क.जे.सोमैया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

राहुरी तालुका जावेद शेख

येथील क.जे. सोमैया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच या निमित्ताने विद्यालयाचा ६१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाहिद शेख (९५.६०%) प्रथम, तर तेजस शिरसाट(९२.८०%) द्वितीय, जियान शेख(९२.२०%) गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. ९०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे चार तर ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे नऊ विद्यार्थी आहेत. विद्यालयाचा निकाल ८०.६० लागला.तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला विभागात त्रिभुवन चंद्रकांत परदेशी(६४.१० %) प्रथम, शेख मोहसीन रमजान(६०.१७%) द्वितीय, नन्नवरे अश्विनी जालिंदर (५०.६७%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

वाणिज्य विभागात जावळकर कावेरी सुधीर (६८.६७%) प्रथम, जाधव तुषार बन्सी(६७.१७%) द्वितीय, उदावंत समर्थ बापूसाहेब (५७.६७ %) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ५१.६१ % लागला.
या सत्कार प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन श्री रणजीत श्रीगोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री जितेंद्र अग्रवाल, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासनाधिकारी श्री कांबळे सर, पालकांमध्ये श्री शिरसाठ श्री शिंपी, सौ. वाव्हळ,श्री आलाटे, श्री पीडीयार, श्री फैरोज शेख, श्री इकबाल शेख आदी उपस्थित होते.

विद्यालयाच्या या उपक्रमाचे परिसरातील शिक्षण प्रेमी नागरिक व पालक यांनी कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे