Breaking
ब्रेकिंग

शितल मिलिंद नाईकवाडी यांची यशस्वी झेप ; अमृतसागर दूध संघाच्या वार्षिक अहवालात वैयक्तिक दूध उत्पादकांत तिसरा क्रमांक.

0 7 6 9 4 3

शितल मिलिंद नाईकवाडी यांची यशस्वी झेप ; अमृतसागर दूध संघाच्या वार्षिक अहवालात वैयक्तिक दूध उत्पादकांत तिसरा क्रमांक.

राहुरी तालुका जावेद शेख

श्रीदत्त दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासद सौ. शितल मिलिंद नाईकवाडी यांनी आपल्या परिश्रमातून अकोले तालुक्यात दुग्ध व्यवसाय क्षेत्रात लक्षणीय यश संपादन केले आहे. अमृतसागर सहकारी दूध व्यवसायिक व प्रक्रिया संघ मर्या., अकोले यांच्या वार्षिक अहवालात सौ. नाईकवाडी यांनी वैयक्तिक दूध उत्पादकांत तिसरा क्रमांक मिळवला.
नाईकवाडी यांनी १,४४,५७२ लिटर दूध उत्पादन करून हा मानाचा क्रमांक पटकावला. या कामगिरीबद्दल त्यांना अमृतसागर दूध संघाच्या वार्षिक सभेत संघाचे चेअरमन वैभवराव पिचड, उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ सावंत, संचालक गंगाधर नाईकवाडी, जगन देशमुख, आप्पासाहेब आवारी,संचालक दयानंद वैद्य या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी नाईकवाडी कुटुंबीय व गणेश पापळ, श्रीदत्त दूध संस्थेचे चेअरमन दिनकर जाधव, संदीप भोर,मधुकर भोर, संपत भोर, गणेश कोटकर,डॉ.विशाल आरोटे,सत्यम भोर,दत्तू भोर,संतोष भोर ,राजेंद्र वाळुंज,गोरख मालुंजकर सयाजी पोखरकर,राम तळेकर, नाथा भोर,सीताराम भांगरे व तालुक्यातील सर्व दूध उत्पादक आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या यशामुळे दुग्धव्यवसायात महिलादेखील सक्षम योगदान देत असल्याचे चित्र तालुक्यात उमटले आहे.
सौ. शितल मिलिंद नाईकवाडी यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन व्यक्त केले जात आहे. तसेच या दूध उत्पादक गोठ्याचे नाव ओम साई काऊ फार्म अंबड या नावाने २०१७ साली ०६ गाईंपासून सुरुवात झाली आता तब्बल ३८ गाईंमध्ये १४४७७२ लिटर दूध पुरवठा करणारा अकोल्यातील पश्चिम भागात सर्वात जास्त व तालुक्यात तीन नंबरचा मुक्त संचार गोठा नावारूपास आला तसेच या गोठ्याचे व्यवस्थापन हे मिलिंद नाईकवाडी बांधकाम व्यावसायिक व त्यांच्या पत्नी शीतल नाईकवाडी शिक्षिका असूनही हे दोघेही सर्व नियोजन बघतात. या गोठ्यामध्ये फक्त दोन मजुरांसह गोठ्याचे नियोजन पहाटे चार वाजेपासून सात वाजेपर्यंत व सायंकाळी चार वाजेपासून सात वाजेपर्यंत अतिशय उत्कृष्टपणे नियोजनबद्ध चालते या सर्व देखरेखेसाठी फक्त मिलिंद नाईकवाडी यांचे नियोजनामुळे हे सर्व शक्य झाले असे त्यांचे मत त्यांनी व्यक्त केले.
आगामी काळात अकोले तालुक्यात प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवण्याचा निश्चय सौ. शितल नाईकवाडी व मिलिंद नाईकवाडी यांचा आहे तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे