Breaking
ब्रेकिंग

” घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संचाचे वाटप”

0 3 9 0 6 1

” घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संचाचे वाटप”

राहुरी तालुका जावेद शेख

घराघरात सेवा देणाऱ्या आणि आपले आयुष्य इतरांच्या सुखासाठी वाहून घेणाऱ्या, घरेलू कामगारांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ आणि युवाग्राम विकास संस्था, राहुरी यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त आर. एम. भिसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरात संसारोपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात ५३ नोंदणीकृत घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संचाचे वितरण युवाग्राम विकास संस्थेचे संचालक संभाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रभाकर इंगळे, अमोल सोनवणे,शाहिस्ता शेख, अनिता शेलार, संतोष त्रिभुवन आदी सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवाग्राम विकास संस्थेचे संचालक संभाजी पवार म्हणाले की, घरेलू कामगार हे समाजाचे एक अविभाज्य आणि मेहनती अंग आहे. केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनात थोडा हातभार लावण्याचा हा प्रयत्न आहे.
दिनांक ३१ जुलै २०२४ पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय नोंदणीकृत घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून श्रीरामपूर येथे हा कार्यक्रम पार पडला. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लवकरच हे संच देण्यात येतील अशी माहिती संभाजी पवार यांनी दिली.
तसेच यावेळी घरेलू कामगारांच्या महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या.
२९ जानेवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने देशभरातील आणि महाराष्ट्रातील घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र आणि प्रभावी केंद्रीय कामगार कायदा तयार करण्यात यावा. घरेलू कामगारांची ऑनलाईन नोंदणी सुरू करावी. घरेलू कामगार मंडळासाठी राज्य शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच घरेलू कामगारांना अधिकृत मान्यता प्राप्त व्हावी, यासह विविध मागण्यासाठी युवाग्राम विकास संस्थेच्या पुढाकाराने प्रयत्न करण्यात येत आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहिस्ता शेख यांनी, तर आभार अनिता शेलार यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सोनवणे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे