Breaking
ब्रेकिंग

धुळे रस्ता ते पिंपळे रस्ता जोडणाऱ्या डीपी रस्त्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी

0 3 9 0 4 2

धुळे रस्ता ते पिंपळे रस्ता जोडणाऱ्या डीपी रस्त्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : धुळे रस्ता ते पिंपळे रस्त्याला जोडणारा डीपी रोड सव्वा महिना खोदून पडला आहे. रस्त्याचे काम थांबल्याने नागरीकांना त्रास होत आहे. रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.ढेकू रस्ता व पिंपळे रस्त्याच्या परिसरातील नागरिकांना पाच वळणे घेऊन धुळे रस्त्याला जावे लागत होते. किरकोळ अपघात टाळून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी सुमारे सव्वा तीन कोटींचा डीपी रस्ता मंजूर केला आहे. रस्त्याचे काम सुरू झाले. खोदकाम झाले हार्ड मुरूमचा बारीक थर टाकला. मात्र काम थांबल्याने नागरिकांना त्रास होत आहे. लहान मुलांना सायकली हातात उचलून रस्ता ओलांडावा लागत आहे. अनेक ठिकाणी भुयारी गटारीच्या चेंबर चे पाईप तुटले आहेत. नागरिकांचे आऊट लेट चे पाणी रस्त्यावर वाहून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे