समीक्षा सोमनाथ जगदाळे हिचे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आयोजित विज्ञान परीक्षेत उल्लेखनीय यश
समीक्षा जगदाळे हिचा सत्कार समारंभ संपन्न
समीक्षा सोमनाथ जगदाळे हिचे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आयोजित विज्ञान परीक्षेत उल्लेखनीय यश
समीक्षा जगदाळे हिचा सत्कार समारंभ संपन्न
प्रतिनिधी : संवेद वायकर
रुईछत्तीसी (ता. अहिल्यानगर) : येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा सोमनाथ जगदाळे हिने जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आयोजित विज्ञान परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल तिचा सत्कार समारंभ आज थाटामाटात पार पडला.
या सत्कार सोहळ्याला शास्त्रज्ञ रोहित मोरे,डी आर डी ओ आणि व्ही आर डी चे अतिरिक्त संचालक आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी तसेच अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांनी समीक्षाच्या यशाचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी समीक्षाचे पालक, विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार कार्यक्रमाने संपूर्ण विद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
👉 समीक्षा हिने विज्ञान क्षेत्रात आणखी उंच भरारी घेऊन विद्यालयाचे व पालकांचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


