इयत्ता ११ वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षीपासून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया फक्त ऑनलाईन*

*इयत्ता ११ वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षीपासून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया फक्त ऑनलाईन*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
पारोळा ‘-किसान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पारोळा येथील इयत्ता ११ वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया 2025-26 महत्त्वाची सूचना यावर्षीपासून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला ऑफलाइन प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
नोंदणी प्रक्रिया 19 मे 2025 पासून सुरू होणार आहे.
प्रवेशासाठी अधिकृत वेबसाइट:
https://11thadmission.org.in
ऑनलाईन प्रवेशासाठी प्रक्रिया:
१. वेबसाइटला भेट द्या
https://11thadmission.org.in या शासकीय वेबसाइटला भेट द्या.
आपले रहिवासी ठिकाण निवडा (तालुका/शहर).
२. नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन
“New Registration” वर क्लिक करा.
वैयक्तिक माहिती, 10वी बोर्ड माहिती भरून पासवर्ड तयार करा.
३. लॉगिन आयडी तयार होईल
फॉर्म सबमिट केल्यावर लॉगिन आयडी व अॅप्लिकेशन क्रमांक मिळेल. तो सुरक्षित ठेवा.
४. फॉर्म १ भरा
लॉग इन करून पत्ता, पालकांचे तपशील, जात व कॅटेगरी यासंबंधी माहिती भरा.
५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
दहावी मार्कशीट, जात प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, ट्रान्सफर सर्टिफिकेट.
६. रजिस्ट्रेशन फी भरा
ऑनलाइन पेमेंट/डेबिट कार्डद्वारे फी भरणे.
७. फॉर्म २ भरा – कॉलेज पसंती
पसंतीच्या कॉलेजची यादी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
८. मेरिट लिस्ट
एकूण ३-४ मेरिट लिस्ट जाहीर होतील.
पहिल्या यादीत पसंतीचे कॉलेज मिळाल्यास प्रवेश घेणे आवश्यक आहे.
किसान कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
तांत्रिक मदतीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी संपर्क करा:
प्राध्यापक डॉ. संदीप पाटील
किसान कॉलेज, पारोळा
मो.: [ मोबाईल 9511821681]