Breaking
ब्रेकिंग

प्रमोदिनी पाटील राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

0 3 9 0 3 0

प्रमोदिनी पाटील राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : दिल्ली येथील नॅशनल ऍचीवर रिकगनायझेशन फोरम टीम, झेनित इंटरनॅशनल, इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन न्यू दिल्ली संस्थेतर्फे प्रताप हायस्कूल मधील निवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांना आदर्श शिक्षिका तसेच आदर्श समुपदेशक म्हणून सन्मानित करण्यात आले.महिला दिनानिमित्त 9 मार्च रोजी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सिक्कीम आसाम आणि बिहारच्या माजी राज्यपाल कमलताई गवई, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, अमरावतीचे खासदार बलवंत वानखेडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाच्या मित्तल , अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या माजी अध्यक्षा सुरेखा लामतुरे उपस्थित होत्या.प्रमोदिनी पाटील बहुआयामी व्यक्तिमत्व शिक्षण- बीएससी बीएड एम एड एम ए (फिलॉसॉफी), डिप्लोमा इन व्होकेशनल गायडन्स. अमळनेर तालुक्यातील खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप हायस्कूल व पूज्य साने गुरुजींची कर्मभूमीत १९९० पासून शिक्षिका म्हणून कार्यरत. नंतर मुख्याध्यापिका म्हणून कार्य केले. विविध स्पर्धा परीक्षा भारतीय संस्कृत ज्ञान परीक्षा सत्यशोधक प्रज्ञाशोध परीक्षा स्वामी विवेकानंदांचे जीवनावर आधारित परीक्षांचे दरवर्षी आयोजन, सतरा अठरा वर्षापासून एसएससी बोर्ड परीक्षा, चित्रकला परीक्षा च्या केंद्र संचालक म्हणून काम. पंचवीस वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ नाशिक विभागाच्या समुपदेशक म्हणून कार्य, मराठी वाङ्मय मंडळ अभिरुची वाङ्मय मंडळ डायरेक्टर, भारतीय संस्कृती ज्ञान प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन व्यवसाय मार्गदर्शनपर प्रदर्शन, आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा समुपदेशक समितीच्या सदस्य, सर्व शिक्षा अभियान, करिअर मास्टर, मुख्याध्यापक- शिक्षक प्रशिक्षण यांच्या तज्ञ मार्गदर्शक. पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षा संदर्भात शिक्षक मुख्याध्यापकांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण दिले. तसेच नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, धुळे जिल्ह्याच्या को-ऑर्डिनेटर- समन्वयक म्हणून काम पाहिले. अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघ महिला कार्यकारणी सदस्य, दहावी बारावी परीक्षा मार्गदर्शक समुपदेशक. हजारो विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करून तंत्र शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या. शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. कामगार कल्याण मंडळाच्या सल्लागार सभासद. महिला दक्षता समितीच्या सदस्य. नोकरदार कास्ट्राईब संघटनेच्या तालुका महिला अध्यक्ष. दरवर्षी किमान तीन गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांचे दहावी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. काही विद्यार्थ्यांचे पूर्ण शिक्षण करण्याची जबाबदारी घेतली. भारतीय कला व संस्कृती प्रदर्शन व”” वेध भविष्याचा” यासारखे व्यवसाय मार्गदर्शन वर प्रशिक्षण दिले. कोविड कालावधीत २०२० ते २०२२ पर्यंत एक समुपदेशक, तज्ञ मार्गदर्शक व समन्वयक म्हणून कार्य केले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे