गडचिरोली ते अहिल्यानगर प्रवास गाजवणारे पोलीस निरीक्षक भांबळ यांचा स्नेहबंध तर्फे गौरव
गडचिरोली ते अहिल्यानगर प्रवास गाजवणारे पोलीस निरीक्षक भांबळ यांचा स्नेहबंध तर्फे गौरव
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर : तोफखाना पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे तसेच पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर उपस्थित होते.
डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “अहिल्यानगर शहरात कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी पोलीस निरीक्षक भांबळ यांचा अनुभव व कार्यकौशल्य निश्चितच उपयोगी ठरेल. पोलीस निरीक्षक भांबळ हे वांबोरी (ता. राहुरी) येथील रहिवासी असून त्यांनी गडचिरोली, नाशिक, ठाणे, मुंबई येथील क्राईम ब्रँचमध्ये तसेच नंदुरबार आणि अहिल्यानगर येथे पोलीस उपअधीक्षक (गृह) या पदावर कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे .



