Breaking
ब्रेकिंग

“आदिनाथ” च्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धाबे दणाणले; केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार

0 3 9 0 2 1

“आदिनाथ” च्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धाबे दणाणले; केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३/ आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली असून या निवडणुकीमध्ये लढाईपूर्वीच महाबिघाडी पाहायला मिळाली. त्यामुळे धाबे दणाणलेल्या महाविकास आघाडीचे केम गटातील उमेदवार आमदार नारायण पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे याच गटातून माजी आमदार संजयमामा शिंदे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नारायण पाटील यांनी केम ऊस उत्पादक गट व भटक्या विमुक्त जाती जमाती या दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. आमदार संजयमामा शिंदे यांनी फक्त केम या ऊस उत्पादक गटातूनच अर्ज दाखल केलेला होता. माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बलाढ्य आव्हान, महायुतीची वज्रमुठ व बिघाडीमुळे त्रासलेल्या महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी लढण्यापूर्वीच तलवार म्यान करून शरणागती पत्कारल्यामुळे महायुती आदिनाथ बचाव पॅनल निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणार असा ठाम विश्वास सभासद व्यक्त करत आहेत.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला फक्त संजयमामा शिंदे हेच गत वैभव प्राप्त करून देऊ शकतात असा ठाम विश्वास संजयमामा शिंदे यांच्या महायुतीबरोबरच महाविकास आघाडीतील सभासदांनाही वाटत आहे. कारण सरकारच्या सहकार्याशिवाय हा कारखाना सुरू होणे शक्यच नाही. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी महायुतीची वज्रमुठ बांधल्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकारकडून या कारखान्याला मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होऊन कारखाना ऊर्जेत अवस्थेमध्ये येऊ शकतो याची खात्री सभासदांना आहे. याउलट विधानसभेच्या वेळेस एकसंघ असलेली महाविकास आघाडी मध्ये महाबिघाडी पाहायला मिळत आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार, युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या वरती दाखल झालेला खोटा गुन्हा यामुळे जगताप गटात पसरलेली नाराजी, आदिनाथ चा जुना हिशोब चुकता करण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे विश्वासू सुभाष आबा गुळवे हे जाहीरपणे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे सोबत आजपासून (दि. ३) प्रचारात दिसणार आहेत. आदी कारणामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे.

आज संगोबा येथे महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ होणार

श्री. आदिनाथ महाराज देवस्थान येथे सायंकाळी पाच वाजता महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख आमदार रोहित दादा पवार यांचे विश्वासू सहकारी सुभाष आबा गुळवे, त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश दादा चिवटे, भाजपाचे गणेश भाऊ चिवटे यांच्यासह सर्व उमेदवार व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे