Breaking
ब्रेकिंग

शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रमेश नानाभाऊ कुलांगे जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त

शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या हस्ते सत्कार

0 3 9 0 2 5


शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रमेश नानाभाऊ कुलांगे जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त

 शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या हस्ते सत्कार

एस डब्ल्यु न्यूज / वृत्तसेवा

शहर वाहतूक शाखा, अहिल्यानगर येथे कार्यरत असले पोलीस उपनिरीक्षक रमेश नानाभाऊ कुलांगे हे आज सेवेतून सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी सत्कार केला, सत्कार कार्यक्रम साठी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी,अंमलदार हजर होते पोलीस उपनिरीक्षक रमेश कुलांगे हे दि 19 जानेवारी 1991 रोजी पोलीस दलात भरती झाले,त्यांचे मूळ गाव राळेगन म्हसोबा ता. पारनेर हे आहे.त्यांनी आतापर्यंत पोलीस स्टेशन कोतवाली, श्रीरामपूर शहर, राजूर, पोलीस मुख्यालय, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर, वाहतूक शाखा त्यांनी आजपर्यंत सेवा दिली ते सतत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहायचे शहरातील कोणत्याही ठिकाणी ट्राफिक जाम झाले की तात्काळ कर्मचाऱ्यासह ते घटनास्थळी हजर व्हायचे येथे कर्तव्य बजावले शक्यतो पूल झाल्यापासून शहरातील मध्यवर्ती भागातील ट्राफिकचा प्रश्न बराचसा संपलेला आहे रमेश कुलांगे यांनी उड्डाणपूल होण्याच्या पूर्वी चांगल्या प्रकारे ट्राफिक कंट्रोल साठी प्रयत्न केले.
सेवानिवृत्तीसाठी आज रोजी अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती,शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे व वाहतूक शाखेतील सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस उपनिरीक्षक रमेश कुलांगे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे