Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथे राष्ट्रीयकृत बँकेची एटीएम मशीन सुविधा व्हावी – नागरिकांची मागणी

0 3 9 0 8 1

गुंडेगाव येथे राष्ट्रीयकृत बँकेची एटीएम मशीन सुविधा व्हावी – नागरिकांची मागणी

वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

नगर तालुक्यातील गुंडेगाव दहा ते बारा हजार लोकसंख्येचे गाव तसेच नौकरदार वर्ग,शाळा,काॅलेज,खते बियाणे दुकान, किराणा दुकान,आजी माजी सैनिक, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात असुन या ठिकाणी वडघुल, राळेगण, कोरेगाव या ठिकाणचे लोक ये- जा करत आर्थिक उलाढाल करत असतात परंतु यासाठी लागणारी रक्कम ही वाळकी किंवा देऊळगाव येथील एटीएम मध्ये जाऊन आणावी लागते यातच जर येथील एटीएम चा काही घोटाळा असेल तर रिकाम्या हाताने परतावे लागते व वेळ वाया जातो.यामुळे जर गावात एटीएम सुविधा सुरू झाली तर फायद्याचे ठरू शकते. तसेच गावकऱ्यांसाठी सोयीस्कर एटीएममुळे गावकऱ्यांना पैसे काढणे, शिल्लक रक्कम तपासणे आणि इतर बँकिंग व्यवहार करणे सोपे होईल,वेळेची बचत होईल,बँकिंग कामांसाठी गावकऱ्यांना शहरात जाण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल व्यवसाय वाढ होईल एटीएममुळे गावातील दुकाने आणि व्यापारी देखील डिजिटल व्यवहारांसाठी सक्षम होतील, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मदत होईल.आणि गावात एटीएम सुविधा सुरू करणे फायद्याचे ठरू शकते.
परंतु ती सुरू करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आवश्यक आहे. बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य जागा निवडणे आणि खर्चाची माहिती घेणे आवश्यक आहे.यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न होणे अपेक्षित आहे.अशी मागणी गुंडेगाव,वडघुल, राळेगण, कोरेगाव येथील नागरिकांनी केली आहे..

गुंडेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असतात हा व्यवहार सोपा होण्यासाठी गावात एटीएम सुविधा उपलब्ध झाली तर बॅंकेतील वेळ वाचेल तसेच पैशाची देवाणघेवाण सोपी होईल व शहरात जाण्याचा त्रास वाचेल व आर्थिक बचत होईल . यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकने पुढे यावे यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु..

शामराव कासार – अध्यक्ष त्रिदल सैनिक संघ,गुंडेगाव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे