Breaking
ब्रेकिंग

शा. ज नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलन संपन्न

0 3 9 0 3 2

शा. ज नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलन संपन्न

प्रतिनिधी :- पंकज पाटील

नंदूरबार :-शा. ज नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. सन 2024-25 या वर्षाचा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 19 जानेवारी रोजी संपन्न झाला. याप्रसंगी अमितकुमार मनेळ (पोलीस निरीक्षक नंदुरबार शहर) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भावेश सोनवणे उपशिक्षणाधिकारी (योजना जि. प. नंदुरबार) व बाबासाहेब बढे (अधिव्याख्याता जि. प्रशिक्षण संस्था नंदुरबार) यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. इयत्ता पहिली ते चौथी साठी एकूण 18 कार्यक्रम घेण्यात आले. त्यापैकी प्रथम क्रमांक इयत्ता दुसरी अ जंगल रखवाला रे द्वितीय क्रमांक तिसरी ड हिरकणीचे मातृत्व तृतीय क्रमांक तिसरी अ रंगीला मारो ढोलना उत्तेजनार्थ दुसरी ब माऊली माऊली या नृत्यांनी क्रमांक प्राप्त केले. यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक श्रीमती तरूलता कुलकर्णी, मोनिका नेरे, दिपाली पाटील, नरेंद्र जाधव होते. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या नृत्याचा पुन्हा संस्थे अंतर्गत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात दिनांक 21 जानेवारी रोजी निवड करण्यात आली. कै. शालिनी जयंत नटावदकर यांच्या पुण्यस्मरणार्थ 21 जानेवारी रोजी संस्था अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थांतर्गत कार्यक्रमात एकूण 28 नृत्यांचा समावेश होता त्यापैकी द्वितीय क्रमांक शालिनीताई जयंत नटावदकर प्राथमिक विद्या मंदिरातील इयत्ता तिसरी ड च्या हिरकणीचे मातृत्व या नृत्याने मिळविला. संस्थचे अध्यक्ष सुहास नटावदकर, एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावद महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. सुहासिनी नटावदकर, समिधा नटाअध्यक्ष सुहास नटावदकर, एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. सुहासिनी नटावदकर, समिधा नटावदकर, रोहन नटावदकर, एकलव्य विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका शैलजा कापडिया, विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार, सर्व परीक्षक यांच्या हस्ते नृत्य सादर करणारे विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती मोनिका नेरे, विद्या मंदिरातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना स्मृतीचिन्ह देऊन सर्वांचे कौतुक व सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी संस्थेतील सर्व शिक्षक बंधू- भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे